मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष ६ सप्टेंबर || Dinvishesh 6 September ||



जन्म

१. राकेश रोशन, भारतीय चित्रपट अभिनेते (१९४९)
२. जॉन डेल्टन, ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ (१७६६)
३. जेन अडम्स, नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका (१८६०)
४. बॅरिस्टर शरदचंद्र बोस, भारतीय स्वातंत्र्य सेनानी, सुभाषचंद्र बोस यांचे वडील (१८८९)
५. एम. ओ. हसन फारूक, केरळचे राज्यपाल (१९३७)
६. हार्डी संधु, भारतीय पॉप गायक, गीतकार संगीतकार (१९८६)
७. जॉन मकलोड, नोबेल पारितोषिक विजेते शरीरक्रियाशास्त्रज्ञ (१८७६)
८. कमलाबाई रघुनाथ गोखले, भारतीय चित्रपसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार (१९०१)
९. विष्णू सदाशिव कोकजे, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल (१९३९)
१०. एडवर्ड ॲपलटन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८९२)
११. यश जोहर, भारतीय चित्रपट निर्माते दिग्दर्शक (१९२९)
१२. सर्गुन मेहता, भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री, मॉडेल (१९८८)
१३. रिचर्ड रॉबर्ट्स, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९४३)
१४. जोस सॉक्रेटस, पोर्तुगालचे पंतप्रधान (१९५७)

मृत्यू

१. प्रेमनाथ दार, भारतीय उर्दू लेखक, कवी (१९७६)
२. अल्लाउद्दीन खाँ, भारतीय सरोद वादक, संगीतकार (१९७२)
३. गेर्तुड लॉरेन्स, इंग्लिश अभिनेत्री (१९५२)
४. हेंड्रिक वेरवर्र्ड, दक्षिण आफ्रिकेचे पंतप्रधान (१९६६)
५. लेन हटन, इंग्लिश क्रिकेटपटू (१९९०)
६. अकिरा कुरोसावा, जॅपनीज चित्रपट दिग्दर्शक, स्क्रीनराईटर (१९९८)
७. मडेलेने लेंगल, अमेरिकन लेखक (२००७)
८. सली प्रुडहॉम्, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१९३८)
९. बर्ट रेनॉल्ड्स, अमेरिकन अभिनेते (२०१८)
१०. रॉबर्ट मुगाबे, झिम्बाब्वेचे पंतप्रधान (२०१९)

घटना

१. स्वाझीलँडला ब्रिटिश सत्तेतून स्वातंत्र्य मिळाले. (१९६८)
२. थॉमस ब्लांचार्ड यांनी कातकामाच्या यंत्राचे पेटंट केले. (१८१९)
३. पहिल्या भारत आणि पाकिस्तान युद्धास सुरुवात झाली. (१९६५)
४. इटालियन हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी यांच्यावर अयशस्वी प्राणघातक हल्ला झाला. (१९२४)
५. तुर्की मध्ये आलेल्या तीव्र भूकंपात २०००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९७५)
६. भारतीय उच्च न्यायालयाने समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता दिली. (२०१८)
७. दक्षिण आफ्रिकेच्या पंतप्रधानांची संसदेत हत्या करण्यात आली. (१९६६)

महत्व

१. Fight Procrastination Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...