मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष ४ सप्टेंबर || Dinvishesh 4 September ||




जन्म

१. ऋषी कपूर, भारतीय चित्रपट अभिनेते (१९५२)
२. दादाभाई नौरोजी , ब्रिटिश संसदेचे सदस्यत्व मिळालेले पहिले भारतीय, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक (१८२५)
३. सुशीलकुमार शिंदे, भारतीय राजकीय नेते (१९४१)
४. कार्ल सेईट्ज , ऑस्ट्रियाचे राष्ट्राध्यक्ष (१८६९)
५. शंकर सारडा, भारतीय साहित्यिक (१९३७)
६. मोहन जोशी, भारतीय चित्रपट अभिनेते (१९४५)
७. भूपेंद्रनाथ दत्ता, भारतीय लेखक (१८८०)
८. मॅक्स डेलब्रक, नोबेल पारितोषिक विजेते जीवशास्त्रज्ञ (१९०४)
९. अनंत नाग, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेते (१९४८)
१०. किरण मोरे, भारतीय क्रिकेटपटू (१९६२)
११. श्री चक्रधर स्वामी, महानुभाव पंथाचे संस्थापक (१२२१)
१२. कल्की सदाशिवम, भारतीय गायिका , स्वातंत्र्य सेनानी (१९०२)
१३. स्टॅनफोर्ड मुरे, नोबेल पारितोषिक विजेते जीवरसायनशास्त्रज्ञ (१९१३)
१४. क्लीवे ग्रंगर, नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ (१९३४)
१५. शिण्या यामानका, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९६२)
१६. बेयॉन्स नॉलेस, अमेरिकन पॉप गायिका , गीतकार (१९८१)


मृत्यू

१. सय्यद मुस्तफा सिराज, भारतीय लेखक (२०१२)
२. जोस मिग्वेल कॅरेरा, चीलीचे पहिले राष्ट्राध्यक्ष (१८२१)
३. धर्मवीर भारती, भारतीय हिंदी कवी लेखक (१९९७)
४. हांक सुफी, भारतीय गायक, गीतकार (२०१२)
५. इ. एफ. स्कुमाचर, जर्मन अर्थतज्ञ (१९७७)
६. एलिझाबेथ काटा, ऑस्ट्रेलियन लेखिका (१९९८)
७. मोहम्मद उमर मुक्रि, भारतीय विनोदी कलाकार, अभिनेते (२०००)
८. स्टीव्ह आयर्विन, ऑस्ट्रेलियन जीववैज्ञानिक (२००६)
९. जॉन काँट, अमेरिकन अभिनेते (२००६)
१०. लॉरेन्स डीनेन, डच जीवरसायनशास्त्रज्ञ (१९९४)

घटना

१. जॉर्ज इस्टमन यांनी कोडॅक फिल्म कॅमेऱ्याचे पेटंट केले. (१८८८)
२. केंब्रिज थिएटरची सुरुवात झाली. (१९३०)
३. एदुआर्दो फ्रेई माँटलवा हे चिलीचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९६४)
४. मार्क स्पिटझ यांनी ऑलिम्पिक मध्ये ७ सुवर्ण पदक जिंकले. असे करणारे ते एकमेव खेळाडू बनले. (१९७२)
५. Google ने अधिकृतरित्या आपली कंपनी रजिस्टर केली. (१९९८)
६. रघुराम राजन यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे २३ वे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारला. (२०१३)
७. प्रभातच्या संत तुकाराम या चित्रपटाची जगातल्या तीन उत्र्कुष्ट चित्रपटात निवड झाली. (१९३७)


महत्व

१. World Sexual Health Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...