मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष ३० सप्टेंबर || Dinvishesh 30 September ||




जन्म

१. हृषिकेश मुखर्जी, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९२२)
२. व्ही. पी. मेनन, भारतीय राजकिय नेते (१८९३)
३. एम. सी. छागला, भारतीय केंद्रीय मंत्री, न्यायाधीश (१९००)
४. रजिंदर कौर भट्टल, पंजाबच्या मुख्यमंत्री (१९४५)
५. चंद्रकांत पंडित, भारतीय क्रिकेटपटू (१९६१)
६. शंतनु मुखर्जी तथा शान ,भारतीय गायक (१९७२)
७. प्रोसेंजित चॅटर्जी, भारतीय चित्रपट दिग्दर्शक अभिनेते (१९६२)
८. ऐन जार्विस, मातृदिनच्या सहसंस्थापिका (१८३२)
९. जेन पेरिन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८७०)
१०. नेविल्ल फ्रांस्किस मोट्ट, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९०५)
११. चंग ही पार्क, दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष (१९१७)
१२. स्वामी अखंडानंदा, भारतीय हिंदू धर्मगुरू (१८६४)
१३. एलि विझेल,नोबेल पारितोषिक विजेते लेखक, साहित्यिक (१९२८)
१४. जोहंन देईसेनॉफर, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९४३)
१५. चिनू मोदी, भारतीय गुजराती कवी, लेखक (१९३९)
१६. एहूद ओल्मर्ट, इस्राईलचे पंतप्रधान (१९४५)
१७. बेरी मार्शल, नोबेल पारितोषिक विजेते शरीरक्रियाशास्त्रज्ञ (१९५१)


मृत्यू

१. माधवराव सिंधिया, भारतीय केंद्रीय मंत्री (२००१)
२. गंगाधर खानोलकर, भारतीय लेखक ,चित्रकार (१९९२)
३. त्सूल्त्रिम ग्यात्सो, १०वे दलाई लामा (१८३७)
४. जेम्स डीन, अमेरिकन अभिनेता (१९५५)
५. पट्रिक व्हाइट, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१९९०)
६. मार्टिन पर्ल, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (२०१४)
७. शंकर नाग, भारतीय चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक (१९९०)
८. ख्रिस्टा रैनिग, जर्मन कवी, लेखक (२००८)
९. शिमोन सिग्नोरेट, फ्रेंच अभिनेत्री (१९८५)
१०. चंद्राताई किर्लोस्कर, भूदान चळवळीच्या कार्यकर्त्या (१९९८)

घटना

१. भारताच्या लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे आलेल्या तीव्र भूकंपात २८,०००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले, तर कित्येक लोक जखमी ,बेघर झाले. (१९९३)
२. सामुएल स्लॉक्युम यांनी स्टेप्लरचे पेटंट केले. (१८४१)
३. जर्मन आणि सोव्हिएत युनियनने पोलंडची फाळणी केली , जर्मनीने पोलंडच्या पश्चिम भागावर ताबा घेतला तर सोव्हिएत युनियनने पोलंडच्या पुर्व भागावर ताबा घेतला. (१९३९)
४. मजरुह सुलतानपूरी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला. (१९९४)
५. यमन आणि पाकिस्तान यांचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश झाला. (१९४७)
६. हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर हाऊस प्लांट थॉमस एडिसन यांनी पहिल्यांदाच व्यावसायिक रुपात अमेरिकेतील विस्कॉन्सिन एपलटन येथील फॉक्स नदीवर उभारले. (१८८२)
७. बोत्सवानाला ब्रिटिश सत्तेतून स्वातंत्र्य मिळाले. (१९६६)
८. फ्रान्सने मादागास्कर ताब्यात घेतले. (१८९५)
९. इराकमध्ये झालेल्या कार बॉम्ब स्फोटात ३०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१२)


महत्व

१. International Translation Day
२. International Podcast Day
३. Orange Shirt Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...