मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष ३ सप्टेंबर || Dinvishesh 3 September ||




जन्म

१. गिरीष बापट, भारतीय राजकीय नेते (१९५०)
२. किशन महाराज, भारतीय सुप्रसिद्ध तबलावादक (१९२३)
३. शक्ती कपूर, भारतीय चित्रपट अभिनेते (१९५८)
४. पंत महाराज बाळेकुंद्री, भारतीय अध्यात्मिक गुरू (१८५५)
५. फ्रँक बर्नेत, नोबेल पारितोषिक विजेते जीवरेणूशास्त्रज्ञ (१८९९)
६. गजानन किर्तीकर, भारतीय राजकीय नेते (१९४३)
७. उरहो केक्कोणेन, फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष (१९००)
८. राजकुमार दोरेंद्रा सिंघ, मणिपूरचे मुख्यमंत्री (१९३४)
९. कार्ल डेव्हिड अँडरसन, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९०५)
१०. शाहीर कृष्णराव साबळे, महाराष्ट्राचे लोककलावंत (१९२३)
११. र्योजी नोयोरी, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९३८)
१२. मारिओ द्राघी, इटलीचे पंतप्रधान (१९४७)
१३. विवेक ओबेरॉय, भारतीय चित्रपट अभिनेते (१९७६)
१४. साक्षी मलिक, भारतीय महिला कुस्तीपटू (१९९२)
१५. शरद जोशी, शेतकरी संघटनेचे संस्थापक (१९३५)
१६. उत्तम कुमार, भारतीय चित्रपट अभिनेते (१९२६)
१७. श्याम फडके, भारतीय नाटककार (१९३१)
१८. राहुल संघवी, भारतीय क्रिकेटपटू (१९७४)
१९. प्यारेलाल शर्मा, भारतीय संगीतकार (१९४०)

मृत्यू

१. माधव केशव काटदरे, भारतीय कवी (१९५८)
२. पासुपुलेती रमेश नायडू, भारतीय संगीतकार (१९८७)
३. अर्किबोल्ड बॉवर, स्कॉटिश इतिहासकार (१७६६)
४. विल्हेल्म एकेलड , स्वीडिश कवी ,लेखक (१९४०)
५. फ्रँक काप्रा, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक (१९९१)
६. खाप्रुमामा पर्वतकर, भारतीय तबला , सारंगी वादक (१९५३)
७. नारायण महाराज, भारतीय हिंदू धर्मगुरू (१९४५)
८. पांडुरंग शिरोडकर, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (२०००)
९. डोनाल्ड कोलमन, ब्रिटिश अर्थतज्ञ ,इतिहासकार (१९९५)
१०. स्टेवर्ट होलब्रोक, अमेरिकन लेखक (१९६४)

घटना

१. कतारला ब्रिटिश सत्तेतून स्वातंत्र्य मिळाले. (१९७१)
२. कम्युनिस्ट पार्टी ऑफ बेल्जियमची स्थापना झाली. (१९२१)
३. ब्रिटन तसेच अमेरिकेने ग्रेगोरियन कॅलेंडर वापरण्यास सुरुवात केली, यावेळी पूर्वीचे ११ दिवस वगळण्यात आले. (१७५२)
४. सॅन मरिनो हे जगातील सर्वात लहान तसेच सर्वात जुने प्रजासत्ताक राष्ट्र सेंट मरिनस यांनी स्थापन केले. (३०१)
५. अमेरिका आणि जर्मन मध्ये राजकीय संबंधास सुरुवात झाली. (१९७४)
६. दक्षिण आफ्रिकेने संविधान स्वीकारले. (१९८४)
७. eBay ची स्थापना पिएरे ओमिड्यार यांनी केली. (१९९५)
८. न्यूझीलंडने अफगाणिस्तान मधून आपले सैन्य माघारी घेतले. (२०१२)


महत्व

१. Skyscraper Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...