मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २९ सप्टेंबर || Dinvishesh 29 September ||




जन्म

१. मेहमूद अली, भारतीय चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, निर्माता (१९३२)
२. ब्रजेश मिश्रा, भारताचे सुरक्षा सल्लागार (१९२८)
३. डॉ. शरदचंद्र गोखले, भारतीय समाजसेवक (१९२५)
४. नानाशास्त्री दाते, भारतीय पंचांगकर्ते (१८९०)
५. ग्वाडालुपे व्हिक्टोरिया, मॅक्सिकोचे पहिले पंतप्रधान (१७८६)
६. सामोरा महेल, मोजम्बिक देशाचे राष्ट्रपती (१९३३)
७. शशांक मनोहर, सुप्रसिद्ध वकील, cricket Administrator (१९५७)
८. एनरिको फर्मी, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९०१)
९. सशाधर मुखर्जी, भारतीय चित्रपट निर्माता (१९०९)
१०. एस. एच. कपाडिया, भारताचे ३८वे सरन्यायाधीश (१९४७)
११. दर्शन जारीवाला, भारतीय चित्रपट अभिनेते (१९५७)
१२. पीटर मिचेल, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९२०)
१३. जेम्स क्रोनीन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९३१)
१४. लस्झो बियो, बॉल पेनचे संशोधक (१८९९)
१५. राईनर वेइस, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९३२)
१६. सिल्विओ बरलुस्कोनी, इटलीचे पंतप्रधान (१९३६)
१७. मोहंमद खतामी, इराणचे राष्ट्राध्यक्ष (१९४३)
१८. मिचेल बचेलेट, चीलीच्या राष्ट्राध्यक्ष (१९५१)
१९. सत्यव्रत शास्त्री, भारतीय लेखक (१९३०)


मृत्यू

१. बलामानी अम्मा, भारतीय मल्याळम कवयत्री, लेखिका (२००४)
२. रुडॉल्फ डिझेल, जर्मन अभियंता,  डिझेल इंजिन संशोधक (१९१३)
३. लिओन विक्टर ऑगस्ते बॉग्रिओस, फ्रान्सचे पंतप्रधान (१९२५)
४. उस्ताद युनूस हुसेन खाँ, आग्रा घराण्याचे गायक (१९९१)
५. शापुर खरेगत, पत्रकार, इकॉनॉमिस्ट मॅगझिनचे डायरेक्टर (२०००)
६. विल्यम ऐंथोवेन, नोबेल पारितोषिक विजेते शरीरक्रियाशास्त्रज्ञ (१९२७)
७. हेन्री फोर्ड दुसरे, फोर्ड मोटर कंपनीचे अध्यक्ष, अमेरिकन उद्योगपती (१९८७)
८. नगुयेन वॅन थियू, दक्षिण व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष (२००१)
९. सुल्तान सलाहुद्दिन ओवेसी, भारतीय राजकीय नेते (२००८)
१०. जॉर्जस चरपाक, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (२०१०)


घटना

१. दुसऱ्या महायुद्धात किएव्हमध्ये नाझी जर्मन सैन्याने ३३००० हून अधिक ज्यू लोकांची हत्या केली. (१९४१)
२. इटलीने तुर्की सोबत युद्ध पुकारले. (१९११)
३. जॉन डी. रॉकफेलर हे जगातील पहिले अब्जाधीश व्यक्ती ठरले. (१९१६)
४. सोव्हिएत युनियन सैन्याने युगोस्लोवियावर हल्ला केला. (१९४४)
५. जपान आणि चीनमध्ये राजकीय संबंध सुरू झाले. (१९७२)
६. अल्तमस कबीर हे भारताचे ३९वे सरन्यायाधीश झाले. (२०१२)
७. लंडनच्या मेट्रोपॉलिटन पोलिसांची स्थापना करण्यात आली. (१८२९)
८. अश्रफ घणी हे अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (२०१४)
९. आशियामधील पहिले तारांगण बिर्ला तारांगण हे कोलकाता येथे सुरू करण्यात आले. (१९६३)

महत्व

१. World Heart Day
२. Broadway Musicals Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...