मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २७ सप्टेंबर || Dinvishesh 27 September ||




जन्म

१. सॅम्युएल अॅडम्स , अमेरिकन क्रांतिकारी (१७२२)
२. लक्ष्मीपथि बालाजी, भारतीय क्रिकेटपटू (१९८१)
३. राहुल देव, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६८)
४. लुईस बोथा, दक्षिण आफ्रिकेचे पहिले पंतप्रधान (१८६२)
५. वामनराव देशपांडे, भारतीय संगीत समीक्षक (१९०७)
६. रवी चोप्रा, भारतीय चित्रपट निर्माता (१९४६)
७. माता अमृतानंदामायी, भारतीय धर्मगुरू (१९५३)
८. ग्राझिया देलेद्दा, नोबेल पारितोषिक विजेत्या लेखिका (१८७१)
९. गरिकापती वरालक्ष्मी, भारतीय तेलगू चित्रपट अभिनेत्री (१९२६)
१०. रॉबर्ट एडवर्ड, नोबेल पारितोषिक विजेते शरीरक्रियावैज्ञानिक (१९२५)
११. यश चोप्रा , भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता (१९३२)
१२. ऑलिव्हर विल्यम्सन, नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ (१९३२)
१३. अॅवरील लविग्ने, कॅनाडियन गायिका, गीतकार (१९८४)


मृत्यू

१. एस. आर. रंगनाथन, भारतीय गणितज्ञ (१९७२)
२. राजा राममोहन रॉय, ब्राह्मो समाजाचे जनक, समाजसुधारक (१८३३)
३. शोभा गुर्तू, भारतीय शास्त्रीय गायिका (२००४)
४. सय्यद अहमद, भारतीय राजकीय नेते, लेखक (२०१५)
५. अनुताई वाघ, पद्मश्री पुरस्कार विजेत्या समाजसेविका (१९९२)
६. ज्युलियस वाग्नर, नोबेल पारितोषिक विजेते मज्जातंतूशास्त्रज्ञ (१९४०)
७. फ्रान्सिस्को रोचा, ब्राझीलचे पंतप्रधान (१९६२)
८. कामिनी रॉय, भारतीय बंगाली कवयत्री, लेखिका (१९३३)
९. शि. म. परांजपे, भारतीय लेखक ,पत्रकार (१९२९)
१०. महेंद्र कपूर, भारतीय गायक (२००८)
११. मोहम्मद नजीबुल्लाह, अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष (१९९६)


घटना

१. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी केली. (१९२५)
२. मॅक्सिकोला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले. (१८२१)
३. आइन्स्टाइनने E=mc हे समीकरण पहिल्यांदाच जगासमोर मांडले. (१९०५)
४. जपान ,इटली व जर्मनीमध्ये होंशू बेटावर टायफुंमध्ये ५०००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९४०)
५. इराकमध्ये झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटात १०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१३)
६. पाकिस्तानमधील पेशावरमध्ये बस मध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटात १५हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर ४०हून अधिक लोक जखमी झाले. (२०१३)
७. एस. एस. आर्क्टिक ही बोट अटलांटिक महासागरात बुडाली यामध्ये ३००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१८५४)
८. सिएरा लिऑनचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश झाला. (१९६१)
९. मुंबईमध्ये इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ६०हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. (२०१३)
१०. तालिबानने काबुलवर कब्जा केला. राष्ट्राध्यक्ष बुरहानुद्दिन रब्बानीने अफगाणिस्तान मधून पलायन केले, तर पूर्व राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नजिबुल्लाह आणि त्यांच्या भावाची तालिबान्यांनी हत्या केली. (१९९६)

महत्व

१. World Tourism Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...