मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २४ सप्टेंबर || Dinvishesh 24 September ||




जन्म

१. मॅडम भिकाजी रुस्तम कामा, भारतीय क्रांतिकारक (१८६१)
२. डॉ. सखाराम गंगाधर मालशे, भारतीय लेखक (१९२१)
३. गिरालॉमो कॅरदनो, इटलीचे गणितज्ञ (१५०१)
४. गुरु चरणसिंग तोहरा, भारतीय राजकीय नेते , शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष (१९२४)
५. हॉवर्ड फ्लॉरे, नोबेल पारितोषिक विजेते रोगनिदानतज्ञ (१८९८)
६. ऑटार सिंग पटेल, भारतीय वैज्ञानिक, संशोधक (१९२५)
७. गुरु राम दास, शीख धर्मियांचे ४थे गुरू (१५३४)
८. अनंत सदाशिव अळतेकर, भारतीय इतिहासकार (१८९८)
९. सेव्हरो ओचाओ, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९०५)
१०. प्रभाकर शंकर मुजुमदार, भारतीय चित्रपट अभिनेते , रंगभूमी कलाकार (१९१५)
११. केशवराव त्र्यंबक दाते, भारतीय चित्रपट अभिनेते, रंगभूमी अभिनेते (१८८९)
१२. मोहिंदर अमरनाथ, भारतीय क्रिकेटपटू (१९५०)


मृत्यू

१. श्रीपाद जोशी, भारतीय लेखक , शब्दकोशकार (२००२)
२. के. सुरेंद्रनाथ ठीलकण, भारतीय चित्रपट अभिनेते (२०१२)
३. लुईस गरहर्ड गीर, स्वीडनचे पंतप्रधान (१८९६)
४. अलुरी चक्रपाणी, भारतीय तेलगू लेखक, साहित्यिक (१९७५)
५. नील्स रिबर्ग फिंसेन , नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९०४)
६. सर्वमित्र सिकरी, भारताचे १३वे सरन्यायाधीश (१९९२)
७. ब्रूनो पोंतेकॉर्को, इटलीचे भौतिकशास्त्रज्ञ (१९९३)
८. कार्ल लॉमेलेस, युनिव्हर्सल स्टुडिओचे संस्थापक (१९३९)
९. पद्मिनी, भारतीय चित्रपट अभिनेत्री , भरतनाट्यम नृत्यांगना (२००६)
१०. हांस गेईगर, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (१९४५)

घटना

१. होंडा मोटर कंपनीची स्थापना झाली. (१९४८)
२. भारतीय मराठी लेखक कादंबरीकार शिवाजी सावंत यांना मृत्युंजय कादंबरीसाठी भारतीय ज्ञानपीठ संस्थेतर्फे मुर्तिदेवी पुरस्काराने गौरविण्यात आले. (१९९५)
३. गिनी बिसाऊला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळाले. (१९७३)
४. अलेक्झांडर दे यांनी डायल टाईम रेकॉर्डरचे पेटंट केले. (१८८९)
५.भारताने क्रिकेट विश्वातील टी-२० वर्ल्ड कप महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात जिंकला. (२००७)
६. घानाने संविधान स्वीकारले. (१९७९)
७. हाँगकाँग मध्ये कॅथे पॅसिफिक एअरवेजची स्थापना करण्यात आली. (१९४६)
८. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. (१८७३)


महत्व

१. Lash Stylists Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...