मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २१ सप्टेंबर || Dinvishesh 21 September ||




जन्म

१. गुलशन ग्रोव्हर, भारतीय चित्रपट अभिनेते (१९५५)
२. के. आनंदा राऊ, भारतीय गणितज्ञ (१८९३)
३. फ्रान्सिस हॉपकिन्सन, अमेरिकन लेखक (१७३७)
४. हेईके ओन्न्स, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८५३)
५. करीना कपूर- खान, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८०)
६. गुराझदा अप्पाराव, भारतीय तेलगू लेखक (१८६२)
७. चार्ल्स निकॉले, नोबेल पारितोषिक विजेते सूक्ष्मजंतूशास्त्रज्ञ (१८६६)
८. नूरजहाँ, पाकिस्तानी गायिका (१९२६)
९. स्वामी अग्निवेश, भारतीय सामाजिक कार्यकर्ते, आर्यसभा पक्षाचे संस्थापक (१९३९)
१०. रंजिब बिस्वाल, भारतीय क्रिकेटपटू,राजकीय नेते (१९७०)
११. क्वामे नकृमाह, घानाचे पंतप्रधान (१९०९)
१२. डोनाल्ड ए. ग्लासेर, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९२६)
१३. शिंझो आबे, जपानचे पंतप्रधान (१९५४)
१४. ख्रिस गेल, जमैकन, वेस्ट इंडिज क्रिकेटपटू (१९७९)
१५. रीमी सेन, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८१)


मृत्यू

१. ताराचंद बर्जात्या, भारतीय चित्रपट निर्माता (१९९२)
२. सदानंद रेगे, भारतीय मराठी कवी,लेखक (१९८२)
३. गिरोलामो कॉर्दनो, इटालियन गणितज्ञ (१५७६)
४. वॉल्टर स्कॉट, स्कॉटिश इतिहासकार (१८३२)
५. असफ- उद -दौला, मुघल साम्राज्याचे नवाब , वजीर (१७९७)
६. गोपालन कस्तुरी, भारतीय पत्रकार (२०१२)
७. सवाई जयसिंग, जयपूर संस्थांचे राजे (१७४३)
८. अर्मांड कॉलिनेस्कू, रोमानियाचे पंतप्रधान (१९३९)
९. बर्नार्डो हाऊसे, नोबेल पारितोषिक विजेते शरीरक्रियाशास्त्रज्ञ (१९७१)
१०. ऑटीस रेडिंग, अमेरिकन गायक (२०१५)

घटना

१. माल्टा देशाला ब्रिटिश सत्तेतून स्वातंत्र्य मिळाले. (१९६४)
२. जॉन आणि निकोलस हेडेन यांनी आग विजवनीच्या पाण्याच्या नळाचे पेटंट केले. (१६७७)
३. जोहांन ऑस्टरण्येर यांनी फ्लॅश बल्बचे पेटंट केले. (१९३०)
४. सिंगापूर, गाम्बिया, मालदीव या देशांचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश झाला. (१९६५)
५. बेलिझे या देशाला ब्रिटिश सत्तेतून स्वातंत्र्य मिळाले. (१९८१)
६. फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांनी देशात आणीबाणी लागू केली. (१९७२)
७. थाबो मबेकी दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. (२००८)
८. इराकमध्ये झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटात १००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१३)
९. भूतान, बहरीन , कतार या देशांचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश झाला. (१९७१)
१०. आर्मेनिया सोव्हिएत युनियनपासून स्वतंत्र देश झाला. (१९९१)
११. दुसऱ्या महायुद्धात युक्रेनमध्ये नाझी सैन्याने २८०० ज्यू लोकांची हत्या केली. (१९४२)

महत्व

१. International Day Of Peace
२. World Gratitude Day
३. World Alzheimer's Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...