मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २० सप्टेंबर || Dinvishesh 20 September ||




जन्म

१. वा. रा. कांत, भारतीय मराठी कवी ,लेखक, साहित्यिक (१९१३)
२. महेश भट्ट, भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता (१९४८)
३. मार्कंडेय काटजू, भारतीय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष (१९४६)
४. अर्नेस्टो टिओडोरो मोनेटा, नोबेल शांतता पुरस्कार विजेते पत्रकार (१८३३)
५. नानासाहेब परुळेकर, सकाळ वृत्तपत्राचे संस्थापक,संपादक , प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष (१८९७)
६. अक्किनेणी नागेस्वरा राव, भारतीय दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते (१९२३)
७. हम्बेर्तो दे अलेंकॅर कॅस्तेलो ब्रँको, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष (१९००)
८. राम शर्मा , अखिल विश्व गायत्री परिवाराचे संस्थापक, भारतीय धर्मगुरु (१९११)
९. मुनी क्षमासागर, भारतीय जैन धर्मगुरु (१९५७)
१०. सोफिया लॉरेन, इटालियन अभिनेत्री (१९३४)
११. सानी अबाचा, नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष (१९४३)

मृत्यु

१. टी. आर. राजाकुमारी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९९९)
२. एडुर्ड विर्थस, नाझी भौतिकशास्त्रज्ञ (१९४५)
३. दगडू मारुती पवार, भारतीय मराठी कवी, लेखक (१९९६)
४. सलील दत्ता, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (२००४)
५. लुडविक स्वॉबोदा, चेकोस्लोव्हेकियाचे राष्ट्राध्यक्ष (१९७९)
६. पॉल एर्डोस, हंगेरियन गणितज्ञ (१९९६)
७. मार्कोस पेरेझ जिमेनेझ, व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष (२००१)
८. अनूप कुमार, भारतीय चित्रपट अभिनेते (१९९७)
९. बरहानुद्दिन रब्बानी, अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष (२०११)
१०. जगनमोहन दालमिया, बीसीसीआयचे अध्यक्ष, इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष (२०१५)

घटना

१. १८५७ च्या राष्ट्रीय उठावात ब्रिटिश सैन्याने दिल्ली पुन्हा काबीज केली. (१८५७)
२. अॅमस्टरडॅम हार्लेम या मार्गावर नेदरलंड मध्ये पहिल्यांदाच रेल्वे धावली. (१८३९)
३. जॉर्ज सिम्पसन यांनी इलेक्ट्रिक स्टोवचे पेटंट केले. (१८५९)
४. कान्स फिल्म फेस्टीवल पहिल्यांदाच फ्रान्समध्ये आयोजित करण्यात आले. (१९४६)
५. महात्मा गांधी यांनी स्पृश्य अस्पृश्य चालीरीती विरुद्ध आमरण उपोषणाला सुरुवात केली. (१९३२)
६. कॉम्प्युटर प्रोग्राम लँग्वेज फॉर्टण पहिल्यांदाच वापरण्यास सुरुवात केली. (१९५४)
७. बेनिन नायजेरियापासून वेगळा देश झाला. (१९६७)
८. जोस ए डोड हे अँगोलाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९७९)
९. व्हिएतनाम देश संयुक्त राष्ट्रसंघात सामील झाला. (१९७७)


महत्व

१. International Day Of University Sport

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...