मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १९ सप्टेंबर || Dinvishesh 19 September ||




जन्म

१. मकसूद महमूद अली तथा लकी अली , भारतीय गायक (१९५८)
२. श्रीपाद दामोदर सातवळेकर, भारतीय चित्रकार (१८६७)
३. जिन बाप्टिस्ट जोसेफ देलांब्रे, फ्रेंच गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ (१७४९)
४. सुनिता विल्यम्स, भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर, अमेरिकन नेवी ऑफिसर (१९६५)
५. आकाश चोप्रा, भारतीय क्रिकेटपटू (१९७७)
६. गिऊसप्पे सरागत, इटलीचे राष्ट्राध्यक्ष (१८९८)
७. विल्यम गोल्डींग, नोबेल पारितोषिक विजेते लेखक साहित्यिक (१९११)
८. बाबुराव गोखले, भारतीय नाटककार, निर्माता (१९२५)
९. ईशा कोपिकर, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७६)
१०. मासातोशी कोशिबा, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९२६)
११. कल्पना कार्तिक, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९३१)


मृत्यू

१. प्रिया तेंडुलकर, भारतीय मराठी चित्रपट अभिनेत्री (२००२)
२. जेम्स गारफील्ड, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१८८१)
३. ऐनार गरहर्डसन, नॉर्वेचे पंतप्रधान (१९८७)
४. बलवंतराय मेहता, गुजरातचे मुख्यमंत्री (१९६५)
५. ना. रा. शेंडे, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष (१९९२)
६. दमयंती जोशी, भारतीय कथ्थक नृत्यांगना (२००४)
७. झिन अल - अबिदिन - बेन अली, टूनिशियाचे राष्ट्राध्यक्ष (२०१९)
८. अंबर रॉय, भारतीय क्रिकेटपटू (१९९७)
९. सर डेव्हिड लो, जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार (१९६३)
१०. ओले रॉमर, डॅनिश खगोलशास्त्रज्ञ (१७१०)

घटना

१. सेंट किट्स आणि नेव्हिसला यांना ब्रिटिश सत्तेतून स्वातंत्र्य मिळाले. (१९८३)
२. एफराईम मॉरिस यांनी रेल्वेच्या ब्रेकचे पेटंट केले. (१८३८)
३. न्यूझीलंड देशामध्ये महिलांना मतदान करण्याचा हक्क मिळाला. (१८९३)
४. हेन्री मेयर यांनी स्लीपिंग रेल कारचे पेटंट केले. (१८५४)
५. अटलांटा विद्यापीठाची स्थापना झाली. (१८६५)
६. अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जुआन पेरोंन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. (१९५५)


महत्व

१. International Talk Like A Pirate Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...