मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १७ सप्टेंबर || Dinvishesh 17 September ||



जन्म

१. नरेंद्र मोदी, भारताचे १४वे पंतप्रधान (१९५०)
२. मर्थिनस प्रेटोशस, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष (१८१९)
३. प्रबोधनकार ठाकरे, भारतीय लेखक , समाजसुधारक (१८८५)
४. ख्रिस्टियन लॅग, नोबेल शांतता पुरस्कार विजेते समाजसुधारक (१८६९)
५. सिताकांत महापात्र, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ओडिया लेखक (१९३७)
६. जे. आर. जयवर्धने, श्रीलंकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष (१९०६)
७. गगेंद्रणाथ टागोर, भारतीय बंगाली चित्रकार, व्यंगचित्रकार (१८६७)
८. रविचंद्रन अश्विन, भारतीय क्रिकेटपटू (१९८५)
९. चाईम हर्झोग, इस्राएलचे राष्ट्राध्यक्ष (१९१८)
१०. अनंत पै, अमर चित्रकथाचे निर्माता (१९२९)
११. विर्गीलिओ वर्गास, कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष (१९२२)
१२. लालगुडी जयरामन, भारतीय संगीतकार, व्हायोलिन वादक (१९३०)
१३. डॉ. राणी बंग, भारतीय समाजसेविका (१९५१)
१४. थॉमस जे बाटा, बाटा शू कंपनीचे संस्थापक (१९१४)

मृत्यू

१. हसरत जयपुरी, भारतीय चित्रपट गीतकार (१९९९)
२. ऑगस्त साऊएर, ऑस्ट्रेलियन इतिहासकार (१९२६)
३. एम. आर. राधा, भारतीय चित्रपट अभिनेते (१९७९)
४. अदनान मेंद्रेस, तुर्कीचे पंतप्रधान (१९६१)
५. कार्ल पॉपर, ब्रिटिश तत्ववेत्ता ,लेखक (१९९४)
६. कलामंडलं हरिदास, भारतीय संगीतकार, अभिनेते (२००५)
७. जान सिसे, नॉर्वेचे पंतप्रधान (१९९७)
८. वसंत बापट, भारतीय कवी ,संपादक ,लेखक (२००२)
९. हेन्री लुईस, फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ (१९३६)
१०. थिरू कल्याण सुंदरम , भारतीय तमिळ लेखक (१९५३)

घटना

१. हैदबाद संस्थान भारतात विलीन झाले. (१९४८)
२. फिलिप प्रॅट यांनी आग विजवण्याच्या सिस्टीमचे पेटंट केले. (१८७२)
३. अँड्र्यू फिशर हे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान झाले. (१९१४)
४. जपान आणि कोरिया मध्ये आलेल्या चक्रीवादळात २०००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९५९)
५. ब्रायन मुलरोने यांनी कॅनडाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली. (१९८४)
६. बॉस्टन शहराची स्थापना झाली. (१६३०)
७. मलेशियाने संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश केला. (१९५७)

महत्व

१. International Country Music Day
२. World Patient Safety Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...