मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १४ सप्टेंबर || Dinvishesh 14 September ||



जन्म

१. राम जेठमलानी, भारतीय राजकीय नेते, सुप्रसिद्ध वकील (१९२३)
२. पार्श्वनाथ आळतेकर, भारतीय चित्रपट अभिनेते दिग्दर्शक (१८९७)
३. योहान किज, जर्मन गणितज्ञ (१७१३)
४. श्रीकांत जिचकर, भारतातील सर्वाधिक उच्चशिक्षित, तसेच २० पदवी प्राप्त, राजकीय नेते, पत्रकार,वकील, डॉक्टर , युवा लोकसभा सांसद (१९५४)
५. फरीद मुराद, नोबेल पारितोषिक विजेते फिजिशियन (१९३६)
६. कोस्टास करमानलीस, ग्रीसचे पंतप्रधान (१९५६)
७. आयुष्मान खुराणा, भारतीय चित्रपट अभिनेते, गायक (१९८४)
८. सूर्यकुमार यादव ,भारतीय क्रिकेटपटू (१९९०)
९. दमीत्री मेड्वेदेव, रशियाचे राष्ट्राध्यक्ष,पंतप्रधान (१९६५)
१०. रॉबिन सिंघ, भारतीय क्रिकेटपटू (१९६३)
११. तथागत रॉय, मेघालयचे राज्यपाल (१९४५)
१२. अनुकुलचंद्रा चक्रवर्ती, भारतीय धर्मगुरू, सत्संग आश्रमाचे संस्थापक (१८८८)
१३. दर्शनसिंह महाराज, शीख संत, कवी (१९२१)
१४. राहुल कंवाल, भारतीय पत्रकार , इंडिया टुडेचे डायरेक्टर (१९८०)


मृत्यू

१. हरिश्चंद्र बिराजदार, भारतीय कुस्तीगीर, प्रशिक्षक (२०११)
२. ताराशंकर बंदोपाध्याय, भारतीय लेखक ,कादंबरीकार (१९७१)
३. आराॅन बर्र, अमेरिकेचे ३रे राष्ट्राध्यक्ष (१८३६)
४. प्रा. राम जोशी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू (१९९८)
५. आर्थर वेल्सले, ब्रिटिश पंतप्रधान (१८५२)
६. मोंटू बॅनर्जी, भारतीय क्रिकेटपटू (१९९२)
७. विल्यम मॅककिन्ली, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१९०१)
८. टोमास मसारिक, झेकोस्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष (१९३७)
९. नूर मोहम्मद तराकी, अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष (१९७९)
१०. जनेट गायनोर, अमेरिकन अभिनेत्री (१९८४)

घटना

१. Organization Of The Petroleum Exporting Countries ची स्थापना इराक, इराण, कुवेत, सऊदी अरेबिया आणि व्हेनेझुएला या राष्ट्रांनी केली.  (१९६०)
२. रशियन पंतप्रधान पीटर स्टोलिपिन यांच्यावर ऑपेरा हाऊस येथे गोळ्या झाडल्या गेल्या त्यानंतर उपचार सुरू असताना ४ दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. (१९११)
३. हिंदी ही भारताची राष्ट्रीय भाषा घोषित करण्यात आली. हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला. (१९४९)
४. किरिबाटी , टोंगा आणि नौर या देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश झाला. (१९९९)
५. व्हेनेरा २ हे अंतराळयान यशस्वीरित्या शुक्र ग्रहाकडे झेपावले. (१९७८)
६. बिलासपूर अहमदाबाद हावडा एक्स्प्रेस रेल्वे दुर्घटनग्रास्त झाली, यामध्ये ८०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९९७)
७. दौलताबादचा किल्ला भारतीय सैन्याने जिंकला. (१९४८)
८. रशिया प्रजासत्ताक राष्ट्र बनला. (१९१७)


महत्व

१. हिंदी भाषा दिवस

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...