मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १२ सप्टेंबर || Dinvishesh 12 September ||




जन्म

१. ललित प्रभाकर, भारतीय मराठी चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेते (१९८७)
२. हेन्री हडसन, इंग्लिश दर्यावर्दी, खलाशी (१५७५)
३. फिरोझ गांधी, भारतीय राजकीय नेते (१९१२)
४. एच. एच. अस्क्विथ, ब्रिटिश पंतप्रधान (१८५२)
५. प्राची देसाई, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८८)
६. नीलम गोऱ्हे, भारतीय राजकीय नेत्या (१९५४)
७. अमाला अक्किनेनी, भारतीय दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री (१९६७)
८. रसिका जोशी, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेत्री (१९७२)
९. आयरेन जोलिओट - क्युरी, नोबेल पारितोषिक विजेत्या भौतिकशास्त्रज्ञ (१८९७)
१०. बिभुतीभूषण बंदोपाध्याय, भारतीय बंगाली लेखक , साहित्यिक (१८९४)
११. बर्टी अहर्न, आयर्लंडचे पंतप्रधान (१९५१)
१२. पुनीत इसार, भारतीय चित्रपट अभिनेते  (१९५८)
१३. पॉल वॉकर, अमेरिकन चित्रपट अभिनेते (१९७३)


मृत्यू

१. पद्मा चव्हाण ,भारतीय मराठी चित्रपट अभिनेत्री (१९९६)
२. फ्रानकॉइस ग्विझोट, फ्रान्सचे पंतप्रधान (१८७४)
३. सतीश दुभाषी, भारतीय मराठी चित्रपट अभिनेते (१९८०)
४. रामचंद्र कुंदगोळकर, सवाई गंधर्व, भारतीय शास्त्रीय गायक (१९५२)
५. जॉर्ज रीड, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान (१९१८)
६. अर्नेस्ट गेईसेल, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष (१९९६)
७. स्वर्णलथा, भारतीय गायिका (२०१०)
८. शांता जोग, भारतीय मराठी चित्रपट अभिनेत्री (१९८०)
९. विनायक लक्ष्मण भावे, मराठी साहित्य संशोधक ,ग्रंथकार (१९२६)
१०. पंडित मल्लिकार्जुन मन्सूर, भारतीय शास्त्रीय गायक (१९९२)

घटना

१. तुर्कस्तानमध्ये लष्करी उठाव झाला. (१९८०)
२. सिंथेटिक रबरचे पेटंट जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रित्झ हॉफमन यानी केले. (१९०९)
३. अडॉल्फ हिटलर यांनी जर्मन वर्कर्स पार्टीमध्ये प्रवेश केला. (१९१९)
४. ल्यूना २ हे मानव विरहित अंतराळयान चंद्रावर उतरले. (१९५९)
५. इथिओपियाने संविधान स्वीकारले. (१९८७)
६. मेटसॅट हा भारताचा उपग्रह यशस्वीरीत्या प्रक्षेपित करण्यात आले. (२००२)
७. शिंझो आबे यांनी आपल्या जपानच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याचे जाहीर केले. (२००७)
८. हाँगकाँग मधील डिस्नेलॅंन्ड सुरू करण्यात आले. (२००५)

महत्व

१. Grandparents Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...