मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १० सप्टेंबर || Dinvishesh 10 September ||




जन्म

१. अनुराग कश्यप, भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक (१९७२)
२. गोविंद पंत, भारतीय राजकीय नेते (१८८७)
३. विश्वनाथ सत्यनारायण, भारतीय लेखक (१८९५)
४. रणजितसिंहजी विभाजी, भारतीय क्रिकेटपटू (१८७२)
५. अतुल कुलकर्णी, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६५)
६. आर्थर कॉम्प्टन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८९२)
७. टरेन्स ऑनीलल, नॉर्थेन आयर्लंडचे पंतप्रधान (१९१४)
८. मनीष पांडे, भारतीय क्रिकेटपटू (१९८९)
९. भक्ती बर्वे, भारतीय मराठी चित्रपट अभिनेत्री (१९४८)
१०. जॅक मा युन, अलिबाबा ग्रुपचे संस्थापक , चीनचे उद्योगपती (१९६४)
११. बी. डी. जत्ती, भारताचे ५वे उपराष्ट्रपती (१९१२)


मृत्यू

१. सुकुमार रॉय,  भारतीय बंगाली लेखक , कवी (१९२३)
२. मेरी व्हॉलस्टोनक्राफ्ट, इंग्लिश लेखिका (१७९७)
३. जॉर्ज थॉमसन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९७५)
४. श्रीधर पार्सेकर, भारतीय व्हायोलिन वादक (१९६४)
५. कार्लोस लोपेझ, पराग्वेचे राष्ट्राध्यक्ष (१८६२)
६. दमित्री एगोरोव, रशियन गणितज्ञ (१९३१)
७. अगोस्तींनो नेटो, अंगोलाचे राष्ट्राध्यक्ष (१९७९)
८. फेलिक्स ब्लोच, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९८३)
९. डॉ. विश्राम रामजी घोले, भारतीय शल्यचिकित्सक (१९००)
१०. समुएल डोए, लायबेरियाचे राष्ट्राध्यक्ष (१९९०)

घटना

१. दुसऱ्या महायुद्धात कॅनडाने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले. (१९३९)
२. चीनला लीग ऑफ नेशन्सचे सदस्यत्व मिळाले. (१९१९)
३. ब्रिटिश सैन्य मादागास्कर मध्ये उतरले. (१९४२)
४. लुईगी लुकिनीने ऑस्ट्रियाची राणी एलिझाबेथची हत्या केली. (१८९८)
५. पंजाब राज्याचे विभाजन करण्यात आले, पंजाब आणि हरियाणा असे दोन वेगळे राज्य बनले. (१९६६)
६. पॅलेस्टीनन लीबरेशन आर्मीची स्थापना झाली. (१९६४)
७. अफगाणिस्तानमध्ये कुंदुझ येथे झालेल्या आत्मघाती बॉम्ब हल्ल्यात १६हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१२)
८. व्हायकिंग २ हे मानवरहित अंतराळयान मंगळ ग्रहाकडे यशस्वीरीत्या प्रक्षेपित झाले. (१९७५)

महत्व

१. International Creepy Boston Dynamics Robot Horse Day
२. World Suicide Prevention Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...