मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १ ऑक्टोंबर || Dinvishesh 1 October ||



जन्म

१. रामनाथ कोविंद, भारताचे १४वे राष्ट्रपती (१९४५)
२. गजानन माडगूळकर, भारतीय मराठी कवी, लेखक , गीतकार, अभिनेते (१९१९)
३. विल्यम बोईंग , बोईंग कंपनीचे संस्थापक (१८८१)
४. लियाकत अली खान, पाकिस्तानचे पंतप्रधान (१८९५)
५. दिलीप शांघवी, Sun Pharmaceuticals कंपनीचे संस्थापक, भारतीय उद्योगपती (१९५५)
६. जिमी कार्टर, अमेरिकेचे ३९वे राष्ट्राध्यक्ष (१९२४)
७. सचिन देव बर्मन, भारतीय गायक ,संगीतकार (१९०६)
८. जे. एच. पटेल,  कर्नाटकचे मुख्यमंत्री (१९३०)
९. शिवाजी गणेशन, भारतीय दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते (१९२८)
१०. मजरूह सुलतानपूरी, भारतीय कवी, शायर, गीतकार (१९१९)
११. महेश ठाकूर, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेते (१९६९)
१२. थेरेसा मे, ब्रिटिश पंतप्रधान (१९५६)
१३. मिया माॅटले , बार्बाडोसच्या पंतप्रधान (१९६५)
१४. बी. सी. खंडुरी, उत्तराखंडचे मुख्यमंत्री (१९३४)
१५. पी. जी. मेनन, त्रावणकोर कोचीनचे ( केरळ) मुख्यमंत्री (१९०६)


मृत्यू

१. अदुर्थी सुब्बा राव, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९७५)
२. अंट्स पीप, एस्टोनियाचे पंतप्रधान (१९४२)
३. इ. बी. व्हाइट, अमेरिकन लेखक (१९८५)
४. कार्लोस ललेरॉस रेस्ट्रेपो, कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष (१९९४)
५. आदित्य बिर्ला, भारतीय उद्योगपती (१९९५)
६. एरिको डी निकोला, इटलीचे पहिले अध्यक्ष (१९५९)
७. जनिन दर्के, फ्रेन्च अभिनेत्री (१९९३)
८. लुईस लिके, ब्रिटिश भविष्यकार, ज्योतिषी (१९७२)
९. गुल मोहम्मद, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेले जगातील सर्वात ठेंगणे व्यक्ती ,५७cm (१९९७)
१०. अब्दूर रहमान खान, अफगाणिस्तानचे मुस्लिम राज्यकर्ते (१९०१)

घटना

१. भारतात १८३७ मध्ये पहिल्यांदाच टपाल कार्यालयाची सुरुवात करण्यात आली. पुढे लॉर्ड डलहौसी यांनी India Post Office Act 1854 मंजूर केला आणि संपूर्ण भारतात पोस्ट ऑफीस कार्यालयाची स्थापना करण्यात आली. (१८५४)
२. भारतात दशमान पद्धती वापरण्यास सुरुवात करण्यात आली. (१९५८)
३. कार्टून नेटवर्क हे अमेरिकन केबल टेलिव्हिजन चॅनल सुरू झाले. (१९९२)
४. बलोचिस्तान ब्रिटिश सैन्याने जिंकले. (१८८७)
५. युनिव्हर्सिटी ऑफ चिकागोची स्थापना झाली. (१८९२)
६. मद्रास( तामिळनाडू) राज्यातील ११ जिल्हे वेगळे करून आंध्र प्रदेश या नव्या राज्याची स्थापना करण्यात आली. (१९५३)
७. अमेरिकेतील बे लेक फ्लोरिडा येथे वॉल्ट डिस्ने वर्ल्ड सुरू करण्यात आले. (१९७१)
८. नायजेरियाला ब्रिटिश सत्तेतून स्वातंत्र्य मिळाले. (१९६०)
९. नायजेरिया या देशाने संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश केला. (१९६०)


महत्व

१. International Raccoon Appreciation Day
२. International Coffee Day
३. World Vegetarian Day
४. Model T Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...