मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष ६ ऑगस्ट || Dinvishesh 6 August ||




जन्म

१. उर्मिला सिंघ, हिमाचल प्रदेशच्या राज्यपाल (१९४६)
२. आल्फ्रेड तेंनिसन, ब्रिटीश लेखक ,कवी, साहित्यिक (१८०९)
३. के. एम. चंडी, गुजरातचे राज्यपाल (१९२१)
४. अलेक्झांडर फ्लेमिंग, नोबेल पारितोषिक विजेते सूक्ष्मजंतूशास्त्रज्ञ (१८८१)
५. मदिराजू रंगा राव, भारतीय तमिळ लेखक साहित्यिक (१९३५)
६. योगिनी जोगळेकर, भारतीय लेखिका (१९२५)
७. ओम प्रकाश मल्होत्रा, भारतीय सैन्य अधिकारी (१९२२)
८. ए. जी. कृपाल सिंघ, भारतीय क्रिकेटपटू (१९३३)
९. राजेंद्र सिंग, भारतीय पर्यावरणवादी (१९५९)
१०. गॅरी होरणेर, ब्रिटीश पॉप गायिका (१९७२)

मृत्यू

१. कल्पनाथ राय, भारतीय राजकीय नेते (१९९९)
२. वसंत पवार, भारतीय संगीतकार (१९६५)
३. आधार कुमार चटर्जी, भारतीय नौदल प्रमुख (२००१)
४. विरेंद्रकुमार भट्टाचार्य, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक (१९९७)
५. विल्हेल्म स्चेरेर, जर्मन साहित्यीक, इतिहासकार (१८८६)
६. हर्णन साईल्स झुआझो, बोलिव्हियाचे राष्ट्राध्यक्ष (१९९६)
७. एस. के. पोत्तेकट्ट, भारतीय मल्याळम लेखक, साहित्यिक (१९८२)
८. शापुर बखतियार, इराणचे पंतप्रधान (१९९१)
९. सूर्यविर सिंघ, भारतीय क्रिकेटपटू (२००२)
१०. कमल गुहा, भारतीय राजकीय नेते (२००७)
११. सुषमा स्वराज, भारतीय राजकीय नेत्या (२०१९)

घटना

१. जमैकाला ब्रिटन सत्तेतून स्वातंत्र्य मिळाले. (१९६२)
२. बोलिव्हियाला पेरुपासून स्वातंत्र्य मिळाले. (१८२५)
३. कुवेतवर अनधिकृतरित्या ताबा मिळवला म्हणून संयुक्त राष्ट्रांनी इराकवर व्यापारी बंधने घातली. (१९९०)
४. ३०० वर्षाच्या गुलामगिरी नंतर जमैका राष्ट्र ब्रिटीश सत्तेतून स्वतंत्र झाले. (१९६२)
५. जैमे पाझ जमोरा हे बोलिव्हियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९८९)
६. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष घुलाम इशाक यांनी बेनिझीर भुट्टो सरकार भ्रष्टाचार आणि बिघडलेली न्यायव्यवस्था पाहता बरखास्त केले आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा नव्याने निवडणूका जाहीर केल्या. (१९९०)
७. कोरियन प्रवाशी विमान अमेरीकन हद्दीत दुर्घटनग्रास्त झाले यामध्ये २००हून अधिक प्रवाशी मृत्यूमुखी पडले. (१९९६)
८. इराकमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात २०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर ६०हून अधिक लोक जखमी झाले. (२०१३)
९. जपान मधील हिरोशिमा शहरावर अमेरिकेने अणुबॉम्ब हल्ला केला यामध्ये १ लाखाहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच अणुबॉम्ब हल्ला केला गेला. (१९४५)

महत्व

१. Hiroshima Day
२. Wiggle Your Toes Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...