मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष ४ ऑगस्ट || Dinvishesh 4 August ||




जन्म

१. दिलीप प्रभावळकर, भारतीय चित्रपट अभिनेते (१९४४)
२. फेरोजशहा मेहता, भारतीय राजकीय नेते, वकील (१८४५)
३. सदाशिवराव भाऊ, पेशवे, पानिपत लढाईतील सरसेनापती (१७३०)
४. ना. सी. फडके, भारतीय साहित्यिक लेखक, वक्ते (१८९४)
५. शिवाजीराव पाटील निलंगेकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (१९३१)
६. जाम्यांग टसेरींग नामगिल, भारतीय राजकीय नेते (१९८५)
७. यशवंत सिंघ पर्मार, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री (१९०६)
८. शशिकला सैगल, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९३२)
९. किशोर कुमार, भारतीय गायक, संगीतकार, गीतकार, दिग्दर्शक , अभिनेते (१९२९)
१०. विशाल भारद्वाज, भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक (१९६५)
११. क्णूट हम्सून, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१८५९)
१२. संदीप नाईक , भारतीय राजकीय नेते (१९७८)
१३. शमा सिकंदर, भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री (१९८१)
१४. अर्टुरो उंबेर्तो एल्लिया, अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष (१९००)
१५. घुलाम मुस्तफा तबस्सुम, पाकिस्तानी लेखक कवी (१८९९)
१६. डेव्हीड लाँग, न्यूझीलंडचे पंतप्रधान (१९४२)
१७. अरबाज खान, भारतीय चित्रपट अभिनेते दिग्दर्शक निर्माता (१९६७)
१८. बराक ओबामा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१९६१)
१९. राहुल चहर, भारतीय क्रिकेटपटू (१९९९)


मृत्यू

१. विसाखम थिरूनाल, त्रावणकोरचे महाराजा (१८८५)
२. हांस ख्रिस्ट्रियन अंड्रेसेन, लेखक ,कवी ,नाटककार (१८७५)
३. वाजाहत मिर्झा, भारतीय चित्रपट पटकथा लेखक (१९९०)
४. डॉ. काशिप्रसाद जायस्वाल, भारतीय कायदेतज्ञ , विचारवंत (१९३७)
५. वॉशिंग्टन लुईस, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष (१९५७)
६. एडगर एड्रियन, नोबेल पारितोषिक विजेते शरीरक्रिया वैज्ञानिक (१९७७)
७. फ्रेडरिक चॅपमॅन रॉबिन्स, नोबेल पारितोषिक विजेते बालरोगतज्ञ (२००३)
८. नंदिनी सत्पथी, ओडिसाच्या मुख्यमंत्री (२००६)
९. एन. आर. नंदी, भारतीय तमिळ लेखक कवी नाटककार (२००२)
१०. जीन कॉल्मेट, जगातील सर्वात वयोवृद्ध महिला, १२२ वर्ष (१९९७)

घटना

१. भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे अप्सरा नामक सहावी अणुभट्टी सुरू करण्यात आली. (१९५६)
२. अमेरिकन सरकारने पहिल्यांदाच कर गोळा करण्यास सुरुवात केली. (१८६२)
३. कोलंबियाने आपले संविधान लागू केले. (१८८६)
४. जपानमध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. (१९४७)
५. मरणोत्तर त्वचादान करण्यासाठी भारतात पहिली स्किन बँक लोकमान्य टिळक रुग्णालयात स्थापन करण्यात आली. (२००१)
६. अमेरिकेने पहिले चंद्राच्या कक्षेत जाणारे अंतराळयान यशस्वीरित्या प्रक्षेपित केले. (१९७१)
७. नासाचे फिनिक्स अंतराळयान यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आले. (२००७)
८. यमन येथे झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात ४०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले.(२०१२)
९. बेरुत लेबनान येथे झालेल्या भीषण स्फोटात २००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर ३०००००हून अधिक लोक बेघर झाले. (२०२०)


महत्व

१. Single Working Women's Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...