मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष ३० ऑगस्ट || Dinvishesh 30 August ||



जन्म

१. रविशंकर प्रसाद, भारतीय राजकीय नेते (१९५४)
२. नवल होमुर्सिजी टाटा, भारतीय उद्योगपती (१९०४)
३. ना. धों. ताम्हणकर, भारतीय बालसाहित्यिक (१८९३)
४. जॅकोब्स हेनरीयस हॉफ, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१८५२)
५. भगवतीचरण वर्मा, भारतीय हिंदी कवी, कथाकार (१९०३)
६. अर्नेस्ट रुथरफॉर्ड, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८७१)
७. गुरू रंधावा, भारतीय गायक,गीतकार, संगीतकार (१९९१)
८. चित्रांगदा सिंग, भारतीय चित्रपट अभिनेत्री, मॉडेल (१९७६)
९. वॉरेन बफेट, अमेरिकन उद्योगपती (१९३०)
१०. मधुकर साठे, भारतीय क्रिकेटपटू (१९३४)
११. थिओडोर स्वेडबर्ग,नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१८८४)
१२. एडवर्ड पूर्सेल, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९१२)
१३. स्वामी कुवलायनंदा, भारतीय योगगुरू, संशोधक, वैज्ञानिक (१८८३)
१४. कॅमेरॉन डियाझ, अमेरिकन अभिनेत्री (१९७२)
१५. बिनायक आचार्य, ओडिशाचे मुख्यमंत्री (१९१८)


मृत्यू

१. प्रसन्ना कुमार टागोर, हिंदू कॉलेजचे संस्थापक (१८८६)
२. शं. गो. तुळपुळे, प्राचीन मराठी भाषा अभ्यासक (१९९४)
३. बिपन चंद्र,भारतीय इतिहासकार (२०१४)
४. नारायणराव पेशवे यांची शनिवारवाड्यात हत्या केली. (१७७३)
५. चार्ल्स देसोर्म्स, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ (१८६२)
६. विल्हेल्म वियन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९२८)
७. नारायण मुरलीधर गुप्ते, भारतीय मराठी कवी (१९४७)
८. जे. जे. थॉमसन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९४०)
९. मोहम्मद अली रजाई, इराणचे राष्ट्राध्यक्ष (१९८१)
१०. एन. एस. कृष्णन , भारतीय चित्रपट अभिनेते (१९५७)
११. कृष्ण कुमार बिर्ला ,भारतीय उद्योगपती (२००८)
१२. सिअमुस हिने, नोबेल पारितोषिक विजेते लेखक साहित्यिक (२०१३)
१३. एम. एम. कळबुर्गी, भारतीय लेखक (२०१५)
१४. जयंत पांडुरंग नाईक, भारतीय स्वातंत्र्य सेनानी, लेखक (१९८१)

घटना

१. जॉन बॅटमॅन यांनी ऑस्ट्रेलिया मधील  मेलबर्न शहराचा पाया रचला. (१८३५)
२. ह्युस्टन या अमेरिकेतील शहराचा पाया ऑगस्टस चापमन आणि जॉन कीर्बी अल्लेन यांनी रचला. (१८३६)
३. गुरू रामदास शिखांचे ४थे गुरू झाले. (१५७४)
४. जर्मनीने पॅरिसवर हवाई हल्ला केला, यामध्ये दोन लोकांचा मृत्यू झाला. (१९१४)
५. सोव्हिएत युनियनचे सैन्य बूचारेस्त रोमानिया मध्ये दाखल झाले. (१९४४)
६. झेकोस्लोवाकिया प्रजासत्ताक देश झाला. (१९१८)
७. बतावियन सैन्य ब्रिटिश सैन्यास शरण आले. (१७९९)

महत्व

१. International Cabernet Sauvignon Day
२. International whale shark Day
३. International Day Of The Victims Of Enforced Disappearances 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...