मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष ३ ऑगस्ट || Dinvishesh 3 August ||




जन्म

१. क्रांतिसिंह नाना पाटील, भारतीय स्वातंत्र्य सेनानी, समाजसुधारक (१९००)
२. मैथिलीशरण गुप्त, भारतीय लेखक कवी, साहित्यिक (१८८६)
३. रमेश भाटकर, सुप्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते (१९४९)
४. शकील बदायुनी, भारतीय लेखक कवी (१९१६)
५. आल्फ्रेड डीकीन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान (१८५६)
६. स्टॅन्ली बाल्डविन, ब्रिटिश पंतप्रधान (१८६७)
७. श्री प्रकाश, आसामचे राज्यपाल (१८९०)
८. सुनील छेत्री, भारतीय फुटबॉलपटू (१९८४)
९. सुनील ग्रोव्हर, भारतीय चित्रपट टेलिव्हिजन अभिनेते (१९७७)
१०. उदयशंकर भट्ट, भारतीय लेखक हिंदी नाटककार (१८९८)
११. अर्नेस्टो गेईसेल, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष (१९०७)
१२. बलविंदर संधू, भारतीय क्रिकेटपटू (१९५६)
१३. अभिसित वैजाजिवा, थायलंडचे पंतप्रधान (१९५६)
१४. यशवंत विठोबा चित्तल, भारतीय कन्नड लेखक (१९२८)
१५. वनिष्री, भारतीय तमिळ चित्रपट अभिनेत्री (१९४८)

मृत्यू

१. चिन्मयानंद सरस्वती, भारतीय धर्मगुरू, विचारवंत (१९९३)
२. देवदास गांधी, महात्मा गांधींचे पुत्र, पत्रकार, हिंदुस्तान टाईम्सचे संपादक (१९५७)
३. जोसेफ कोन्राड, ब्रिटीश लेखक (१९२४)
४. रिचर्ड विल्लस्टर, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९४२)
५. सरोजिनी वैद्य, भारतीय लेखिका (२००७)
६. जॉन ह्युम, नोबेल शांतता पारितोषिक विजेते राजकीय नेते (२०२०)
७. जॉन गार्डनर, ब्रिटीश लेखक (२००७)
८. अलेक्झांडर सोल्झेनिट्सन, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (२००८)
९. एमिल बर्लिनर, फोनोग्राफचे संशोधक ,वैज्ञानिक (१९२९)
१०. शैलेंद्र मोहन बोस, भारतीय क्रिकेटपटू (१९७७)

घटना

१. इंडियन अटॉमिक एनर्जी कमिशनची स्थापना झाली. (१९४८)
२. इटलीच्या सैन्याने ब्रिटीश सोमालियावर हल्ला केला. (१९४०)
३. नायजेरियाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले. (१९६०)
४. आंतर महाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक स्पर्धा आयोजित करणारे महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेची हौशी आणि प्रायोगिक नाट्यसंस्था सुरू झाली. (१९३६)
५. अफगाणिस्तानमध्ये जलालाबाद येथे झालेल्या आत्मघातकी बॉम्ब स्फोटात ९ लोक मृत्यूमुखी पडले. (२०१३)
६. हसन रौहाणी हे इराणचे पुन्हा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (२०१७)
७. द फायरस्टोन टायर अँड रबर कंपनीची स्थापना झाली. (१९००)

महत्व

१. Clean Your Floors Day
२. Esther Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...