मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २७ ऑगस्ट || Dinvishesh 27 August ||




जन्म 

१. दोराबजी टाटा, भारतीय उद्योगपती (१८५९)
२. नारायण धारप, भारतीय मराठी लेखक , साहित्यिक (१९२५)
३. कार्ल बोष्च, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१८७४)
४. सेतुमाधवराव पगडी, भारतीय इतिहासकार, संशोधक (१९१०)
५. दलीप सिंग राना, द ग्रेट खली, भारतीय कुस्तीपटू (१९७२)
६. व्हिन्सेंट ऑरिओल, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष (१८८४)
७. लिंडन बी. जॉन्सन, अमेरिकेचे ३६वे राष्ट्राध्यक्ष (१९०८)
८. वि. रा. करंदीकर, संतसाहित्याचे अभ्यासक (१९१९)
९. चार्ल्स राॅल्स, राॅल्स राॅयस लिमिटेड कंपनीचे सहसंस्थापक (१८७७)
१०. श्री चिन्मोय , भारतीय योगगुरू, धर्मगुरू (१९३१)
११. जुहान पार्टस, एस्टोनियाचे पंतप्रधान (१९६६)
१२. जसवंत सिंग नेकी, भारतीय पंजाबी लेखक, कवी (१९२५)
१३. सर डोनाल्ड ब्रॅडमन, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू (१९०८)
१४. जिम सर्भ, भारतीय चित्रपट अभिनेते (१९८७)
१५. नागेंद्रा प्रसाद सर्बाधिकारी, भारतीय फुटबॉल खेळाडू, फादर ऑफ इंडियन फुटबॉल (१८६९)
१६. नेहा धुपिया, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेत्री (१९७२)
१७. सब्यासाची मोहापत्रा, भारतीय ओडिया चित्रपट दिग्दर्शक, निर्माता (१९५०)


मृत्यू

१. मुकेश चंद माथूर, भारतीय गायक (१९७६)
२. चित्तरंजन मित्रा, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (२००८)
३. लॉर्ड माउंटबॅटन, भारताचा शेवटचा व्हाइसरॉय (१९७९)
४. बसू भट्टाचार्य, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९९७)
५. जगन्नाथ आजगावकर, संतचरित्रकार (१९५५)
६. आनंदामाई मां, भारतीय धर्मगुरू, योगगुरू (१९८२)
७. विल्यम चॅपमन  रोलस्टन, बँक ऑफ कॅलिफोर्नियाचे संस्थापक (१८७५)
८. हृषिकेश मुखर्जी, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (२००६)
९. मधु मेहता, भारतीय सामाजिक कार्यकर्ते (१९९५)
१०. मनोरमा वागळे, भारतीय चित्रपट, रंगभूमी अभिनेत्री (२०००)

घटना

१. रोमानियाने ऑस्ट्रिया - हंगेरी विरुद्ध युद्ध पुकारले. (१९१६)
२. मलेशियाने संविधान स्वीकारले. (१९५७)
३. क्युबाने जर्मनी ,इटली आणि जपान विरुद्ध युद्ध पुकारले. (१९४२)
४. अमेरिकन सैन्य जपानने युद्धात शरणागती पत्करली त्यानंतर जपान मध्ये दाखल झाले. (१९४५)
५. "द गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड" हे सर्वप्रथम ग्रेट ब्रिटन मध्ये प्रकाशित करण्यात आले. जे आता "गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुक " म्हणून ओळखले जाते. (१९५५)
६. "अश्रूंची झाली फुले" या वसंत कानेटकर लिखित तसेच पुरुषोत्तम दार्व्हेकर दिग्दर्शित नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई मध्ये पार पडला. (१९६६)
७. लॉर्ड माउंटबॅटन शेवटचे भारताचे व्हाइसरॉय यांची हत्या उत्तर पश्चिम आयर्लंड मध्ये आयर्लंड स्वातंत्र्य सेनानी यांच्याकडून करण्यात आली.  (१९७९)
८. मोल्डोव्ह या देशाला सोव्हिएत युनियन पासून स्वातंत्र्य मिळाले. (१९९१)
९. चोन डू हान हे दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९८०)


महत्व

१. World Rock Paper Scissors Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...