मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २५ ऑगस्ट || Dinvishesh 25 August ||




जन्म

१. राजीव कपूर, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६२)
२. गंगाधर गोपाळ गाडगीळ, भारतीय मराठी लेखक, साहित्यिक (१९२३)
३. सीन टी. ऑकेली, आयर्लंडचे राष्ट्राध्यक्ष (१८८२)
४. विरचंद गांधी,भारतीय जैन विचारवंत (१८६४)
५. फ्रेडरिक रॉबिन्स, नोबेल पारितोषिक विजेते सूक्ष्मजंतूशास्त्रज्ञ (१९१६)
६. डेजी शाह, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८४)
७. अशोक पत्की, भारतीय संगीत दिग्दर्शक (१९४१)
८. अकबर हशेमी रफसंजनी, इराणचे राष्ट्राध्यक्ष (१९३४)
९. संजीव शर्मा, भारतीय क्रिकेटपटू (१९६५)
१०. डॉ. तस्लिमा नसरीन, बांगलादेशच्या स्त्रीमुक्तीवादी (१९६२)
११. राम पूनियाणी, भारतीय प्राध्यापक, लेखक (१९४५)
१२. पुरुषोत्तम अग्रवाल, भारतीय लेखक (१९५५)


मृत्यू

१. जेम्स वॅट, स्कॉटिश शास्त्रज्ञ, संशोधक (१८१९)
२. अजित वाचाणी, भारतीय चित्रपट अभिनेते (२००३)
३. डेव्हिड हुम, स्कॉटिश इतिहासकार, तत्ववेत्ता (१७७६)
४. विल्यम हर्सचेल, जर्मन ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ (१८२२)
५. भाई गुरुदास, भारतीय शीख इतिहासकार, लेखक (१६३६)
६. कुरोडा कियोटका, जपानचे पंतप्रधान (१९००)
७. हेन्री बेक्क्वेरेल, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९०८)
८. कार्ल बार्स्क, डोनाल्ड डक या कार्टूनचे रचेता, चित्रकार (२०००)
९. नील आर्मस्ट्राँग, चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव , अमेरिकन  अंतराळवीर (२०१२)
१०. जेम्स क्रोनिन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (२०१६)
११. रघुनाथ पनिग्रही, भारतीय गायक (२०१३)

घटना 

१. उरुग्वे हा देश ब्राझील सत्तेतून स्वतंत्र झाला. (१८२५)
२. झिंबाब्वेने संयुक्त राष्ट्रात प्रवेश केला. (१९८०)
३. अमेरिकेने जर्मनी सोबत शांतता करार केला. (१९२१)
४. पवलोस कौंदुरीयस हे ग्रीसचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९२६)
५. जॅनिओ क्वाद्रोस यांनी ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. (१९६१)
६. एअरबस ए ३२० ने पहिले उड्डाण केले. (१९९१)
७. दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांनी पॅरिस स्वतंत्र केले. (१९४४)
८. पॅराग्वेने संविधान स्वीकारले. (१९६७)
९. झांबियाने संविधान स्वीकारले. (१९७३)


महत्व

१. Independence Day Of Uruguay

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...