मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २१ ऑगस्ट || Dinvishesh 21 August ||




जन्म

१. सुधाकरराव नाईक, महाराष्ट्राचे १३वे मुख्यमंत्री (१९३४)
२. कनिका कपूर, भारतीय गायिका (१९८१)
३. पेमा खंडू, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री (१९७९)
४. पेरी ख्रिस्ती, बहामाचे पंतप्रधान (१९४४)
५. राज बहादुर, स्वतंत्र भारताचे पहिले पर्यटन मंत्री (१९१२)
६. बी. सत्या नारायण रेड्डी, पश्चिम बंगालचे राज्यपाल (१९२७)
७. श्रीपाद दाभोळकर, भारतीय गणितज्ञ (१९२४)
८. भूमिका चावला, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७८)
९. व्ही. बी. चंद्रशेखर, भारतीय क्रिकेटपटू (१९६१)
१०. उसेन बोल्ट, जमैकन धावपटू (१९८६)
११. सर्गेई ब्रिन, गुगलचे सहसंस्थापक (१९७३)
१२. ना. घ. देशपांडे, भारतीय कवी, लेखक (१९०९)
१३. जी. एस. आर. सुब्बा राव, भारतीय रसायनशास्त्रज्ञ (१९३७)

मृत्यू

१. सुब्रमण्यम चंद्रशेखर, नोबेल पारितोषिक विजेते भारतीय गणितज्ञ (१९९५)
२. गोपीनाथ मोहंती, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक (१९९१)
३. प्रेमलीला ठाकरसी, एस. एन. डी. टी. विद्यापीठाच्या कुलगुरू (१९७७)
४. उस्ताद बिस्मिल्ला खाँ, भारतरत्न सुप्रसिद्ध सनईवादक (२००६)
५. विनू मांकड, भारतीय क्रिकेटपटू (१९७८)
६.. विनायकराव कुलकर्णी, गोवा मुक्तीसंग्राम सेनानी (२०००)
७. सच्चिदानंद राऊत, भारतीय उडिया भाषिक कवी लेखक (२००४)
८. पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर, गांधर्व महाविद्यालय संस्थापक, संगीतज्ञ, गायक (१९३१)
९. मिसेल पास्त्रणा बोरेरो, कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष (१९९७)
१०. डॅनिएल लीसुलो, झांबियाचे पंतप्रधान (२०००)


घटना

१. पॅरिस मधील लूव्र संग्रहालयातील लिओनार्डो द व्हींसी यांचे मोनालिसा हे चित्र चोरीस गेले . (१९११)
२. जॉन हॅम्प्टन यांनी व्हेनेशियन शैलीच्या खिडकीचे पेटंट केले. (१८४१)
३. पहिल्या महायुद्धात इटलीने तुर्की सोबत युद्ध पुकारले. (१९१५)
४. हवाई हे अमेरिकेचे ५०वे राज्य बनले. (१९५९)
५. रोमानियाने संविधान स्वीकारले. (१९६५)
६. लाटवियाला सोव्हिएत युनियनपासून स्वातंत्र्य मिळाले. (१९९१)

महत्व

१. International Day Of Remembrance And Tribute To The Victims
२. Internet Self- Care Day
३. World Senior Citizen's Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...