मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २० ऑगस्ट || Dinvishesh 20 August ||




जन्म

१. राजीव गांधी, भारताचे ६वे पंतप्रधान (१९४४)
२. एन. आर. नारायण मूर्ती, भारतीय उद्योगपती, इन्फोसिस कंपनीचे सहसंस्थापक ,सीईओ (१९४६)
३. रणदीप हुडा, भारतीय चित्रपट अभिनेते (१९७६)
४. बेंजामिन हॅरिसन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१८३३)
५. रेयमंड पॉइंकेर, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान (१८६०)
६. डी. देवराज उर्स, कर्नाटकचे मुख्यमंत्री (१९१५)
७. संयोगिता राणे, गोव्याच्या पहिल्या महिला राज्यसभा सदस्य (१९२३)
८. गोस्था पाल, भारतीय फुटबॉलपटू (१८९६)
९. सल्वातोरे क्वासीमोडो, नोबेल पारितोषिक विजेते इटालियन लेखक (१९०१)
१०. हिडेकी शिराकावा, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९३६)
११. चंद्रकांत बक्षी, भारतीय गुजराती लेखक (१९३२)
१२. बसवराजू वेंकटा पद्मनाभ राव, भारतीय चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक (१९३१)
१३. स्लोबोडण मिलोसेवीक, सर्बियाचे  राष्ट्राध्यक्ष (१९४१)
१४. डेमी लावाटो, अमेरिकन अभिनेत्री, गायिका ,गीतकार (१९९२)


मृत्यू

१. राम शरण शर्मा, भारतीय इतिहासकार (२०११)
२. जयंत साळगावकर, भारतीय ज्योतिर्भास्कर, लेखक , उद्योजक (२०१३)
३. नरेंद्र दाभोळकर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक (२०१३)
४. पॉल एहरलीच, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९१५)
५. मधुकर रामराव यार्दी, भारतीय विद्याभवण पुणे केंद्राचे अध्यक्ष (२००१)
६. अडॉल्फ वाॅण बेयर, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९१७)
७. माधवराव शिंदे, भारतीय चित्रपट दिग्दर्शक , निर्माता (१९८८)
८. पर्सी ब्रिडगमन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९६१)
९. प्राणलाल व्ही मेहता, भारतीय चित्रपट निर्माता (२०००)
१०. मेल्स झेनावी , इथिओपियाचे पंतप्रधान (२०१२)


घटना

१. सर रोनाल्ड रॉस यांनी भारतामध्ये हिवतापास कारण होणाऱ्या जीवाणूंचा शोध लावला. (१८९७)
२. डायल टेलिफोनचे पेटंट चार्ल्स एरिक्सन आणि जॉन एरिक्सन यांनी केले. (१८९६)
३. राजाराम मोहन रॉय, कालिनाथ रॉय तसेच द्वारकानाथ टागोर यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. (१८२८)
४. सेनेगलने मालीपासून स्वातंत्र्य घोषित केले. (१९६०)
५. सोव्हिएत युनियन सैन्याने हर्बिन आणि मुकडेन ताब्यात घेतले. (१९४५)
६. हंगेरीने संविधान स्वीकारले. (१९४९)
७. इंदिरा गांधी यांनी पाठिंबा काढल्या नंतर चरण सिंघ यांचे सरकार अल्पमतात गेले व त्यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. यानंतर लोकसभा बरखास्त झाली आणि चरण सिंघ हे जानेवारी १९८० पर्यंत काळजीवाहू पंतप्रधान राहिले.  (१९७९)
८. भारत आणि नेपाळ मध्ये आलेल्या भूकंपात १०००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९८८)
९. इराण आणि इराक यांच्यामध्ये अखेर युद्धबंदी करार झाला. तत्पूर्वी तांच्यामध्ये ८ वर्ष युद्ध झाले. (१९८८)

महत्व

१. International Day Of Medical Transporters
२. International Mosquito Day
३. Virtual Worlds Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...