मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १८ ऑगस्ट || Dinvishesh 18 August ||




जन्म

१. निर्मला सीतारमण, भारताच्या अर्थमंत्री, राजकीय नेत्या (१९५९)
२. रणवीर शौरी, भारतीय चित्रपट अभिनेते (१९७२)
३. संदीप पाटील, भारतीय क्रिकेटपटू (१९५६)
४. रघुनाथराव पेशवे, मराठा साम्राज्याचे पेशवे (१७३४)
५. जॉन रसेल्ल, ब्रिटिश पंतप्रधान (१७९२)
६. विजया लक्ष्मी पंडित, महाराष्ट्राच्या राज्यपाल (१९००)
७. एडगर फॉरे, फ्रान्सचे पंतप्रधान (१९०८)
८. टी. एस. सुंदरम, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (१९०४)
९. आर. एस. सुब्बालक्ष्मी, भारतीय सामाजिक कार्यकर्त्या (१८८६)
१०. नेहा महाजन, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९९०)
११. संपूरण सिंघ कालरा तथा गुलझार साब, भारतीय लेखक ,कवी , गीतकार (१९३४)
१२. प्रीती जंघियानी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८०)
१३. सदाशिव शिंदे, भारतीय क्रिकेटपटू (१९२३)
१४. पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर, भारतीय संगीतज्ञ, गायक (१८७२)
१५. दलेर मेहंदी, भारतीय गायक , संगीत दिग्दर्शक (१९६७)
१६. थोरले बाजीराव पेशवे, मराठा साम्राज्याचे पेशवे (१७००)


मृत्यू

१. नेताजी सुभाषचंद्र बोस, भारतीय स्वातंत्र्य सेनानी, आझाद हिंद सेनेचे संस्थापक (१९४५)
२. वॉल्टर ख्राइस्लर  अमेरिकन ख्राइस्लर आॅटोमोटीव्ह कंपनीचे संस्थापक (१९४०)
३. ओट्टो स्टर्न, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९६९)
४. वसंतराव नाईक, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (१९७९)
५. रिचर्ड लॉरेन्स मिलिंगटन सिंग, नोबेल पारितोषिक विजेते जीवरसायनशास्त्रज्ञ (१९९४)
६. नारायण धारप, भारतीय लेखक (२००८)
७. जोसेफ ई. सिग्राम, सिग्राम कंपनीचे संस्थापक (१९१९)
८. पर्सिस खंबाटा, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९९८)
९. किम दे जुंग, दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष (२००९)
१०. एली व्हिटनी ब्लेक, मोर्टीस लॉकचे संशोधक (१८८६)

घटना

१. नेदरलँड्स आणि जपानमध्ये व्यापार करार झाला. (१८५८)
२. अमेरिकेतील सर्व स्त्रियांना मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला. (१९२०)
३. हवामान अंदाज दाखवणारा नकाशा पहिल्यांदाच टेलिव्हिजनवर दाखवण्यात आला. (१९२६)
४. सुकान्रो इंडोनेशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडले गेले. (१९४५)
५. हंगेरीने संविधान स्वीकारले. (१९४९)
६. सजुक्री अल कुवेती हे सिरियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९५५)
७. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी विरोधकांकडून हक्कभंगाची कारवाई होईल हे पाहून आपल्या पदाचा राजीनामा दिला. (२००८)
८. इमरान खान हे पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून निवडून आले. (२०१८)

महत्व

१. आंतरराष्ट्रीय आद्यनिवासी लोक दिन
२. Helium Discovery Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...