मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १७ ऑगस्ट || Dinvishesh 17 August ||




जन्म

१. बिमल जालान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर (१९४१)
२. निनाद बेडेकर, भारतीय इतिहास संशोधक (१९४९)
३. दिशा वकानी, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेत्री (१९७८)
४. मर्सलो कॅटनो, पोर्तुगालचे पंतप्रधान (१९०६)
५. निधी अगरवाल, भारतीय दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री (१९९३)
६. जीआंग झिमिन, चीनचे राष्ट्राध्यक्ष , कम्युनिस्ट पक्ष चीनचे मुख्य सचिव (१९२६)
७. सचिन पिळगावकर, भारतीय चित्रपट अभिनेते (१९५७)
८. सुप्रिया पिळगावकर, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९६७)
९. डॉ विनायक पेंडसे, ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक (१९१६)
१०. क्रांती रेडकर, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८२)
११. वाय. वेणुगोपाल रेड्डी, भारतीय अर्थतज्ञ, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर (१९४१)
१२. इब्राहिम बाबंगिदा, नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष (१९४१)
१३. प्रिया बेर्डे,  भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९६७)
१४. शंकर गणेश दाते, ग्रंथसुचीकार (१९०५)
१५. शरत सक्सेना, भारतीय चित्रपट अभिनेते (१९५०)


मृत्यू

१. मदनलाल धिंग्रा, भारतीय क्रांतिकारी, स्वातंत्र्य सेनानी (१९०९)
२. कोडावतिगंती कुतुंबाराव, भारतीय तमिळ लेखक (१९८०)
३. फ्रेडरिक द ग्रेट, प्रशियाचा राजा (१७८६)
४. पुलिन बेहारी दास, भारतीय स्वातंत्र्य सेनानी, ढाका अनुशिलन समितीचे सहसंस्थापक (१९४९)
५. मोहम्मद झिया उल हक, पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष (१९८८)
६. इलियास कॅनेटी, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१९९४)
७. फ्रान्सिस्को कॉसिगा, इटलीचे राष्ट्राध्यक्ष (२०१०)
८. अल्डो पलाझेस्की, इटालियन लेखक (१९७४)
९. निकॉ जे. पॉलक, डच अर्थतज्ञ (१९४८)
१०. लिओ गीर्ट्स, बेल्जियन लेखक (१९९१)

घटना

१. स्क्रू आवळायच्या पानाचे पेटंट केले. (१९३५)
२. इंडोनेशियाला नेदरलँडपासून स्वातंत्र्य मिळाल्याचे सुकार्नो आणि मोहम्मद हत्ता यांनी घोषित केले. (१९४५)
३. इटलीने तुर्की सोबत युद्ध पुकारले. (१९१७)
४. नार्कोटिक्स अनोनिमस या संस्थेची सभा दक्षिण कॅलिफोर्निया येथे झाली. (१९५३)
५. कोरियाची फाळणी झाली, दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया असे नव्याने देश निर्माण झाले. (१९४५)
६. गबॉन या देशाला फ्रान्सपासून स्वातंत्र्य . (१९६०)
७. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष मुहम्मद झिया उल् हक हे विमान अपघातात ठार झाले. (१९८८)
८. फिलिपाईन्स मध्ये आलेल्या तीव्र भूकंप आणि त्सुनामीत ८,०००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९७६)
९. तुर्कीत आलेल्या भीषण भूकंपात १५०००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर ४००००हून अधिक लोक जखमी झाले. (१९९९)


महत्व

१. Balloon Airmail Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...