मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १४ ऑगस्ट || Dinvishesh 14 August ||




जन्म

१. मोहनिष बेहल, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६१)
२. योगिराज श्री वेदाथिरी महाऋषी, भारतीय धर्मगुरू (१९११)
३. हॅन्स ख्रिस्टियन ओरस्टेड, भौतिकशास्त्रज्ञ (१७७७)
४. एन. एम. आर. सुब्बारमन, भारतीय स्वातंत्र्य सेनानी, राजकीय नेते (१९०५)
५. जॉन गल्सवर्थी, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१८६७)
६. टी. व्ही. रामकृष्णन, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (१९४१)
७. शांता गोखले, भारतीय मराठी लेखिका (१९३९)
८. गोदावरी परुळेकर, सामाजिक कार्यकर्त्या, महाराष्ट्रातील पहील्या महिला वकील (१९०७)
९. जॉनी लिव्हर, भारतीय चित्रपट अभिनेते (१९५७)
१०. सुनिधी चौहान, भारतीय गायिका (१९८३)
११. आझम खान, भारतीय राजकीय नेते (१९५८)
१२. भार्गवी राव, भारतीय तमिळ लेखिका (१९४४)
१३. शमीम हशिम, भारतीय उर्दू कवी लेखक (१९४७)
१४. मोहित रैना, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेते (१९८२)
१५. रिचर्ड आर. ईर्स्ट,नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९३३)


मृत्यू

१. शम्मी कपूर, भारतीय चित्रपट अभिनेते (२०११)
२. विलासराव देशमुख, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (२०१२)
३. जोहांन रेइस्के, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (१७७४)
४. पॉल सबॅटियर, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९४१)
५. फ्रेडरिक जोलिओट क्युरी, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९५८)
६. खाशाबा दादासाहेब जाधव, स्वतंत्र भारताचे पहिले ऑलिम्पिक वैयक्तिक पदक विजेते, कुस्तीपटू (१९८४)
७. एलियास कॅनेटी, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१९९४)
८. नारायना कस्तुरी, भारतीय लेखक , प्राध्यापक , पत्रकार (१९८७)
९. क्सेसलॉ मिलोस्सा, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (२००४)
१०. एन्झो फेरारी, इटालियन स्पोर्ट्स कार निर्माता, स्क्युडेरिया फेरारी ग्रँड प्रिक्स मोटर रेसिंगचे जनक (१९८८)

घटना

१. मुस्लिम लीगने स्वतंत्र देशाची मागणी करत भारताची फाळणी केली आणि ब्रिटिश सत्तेतून पाकिस्तान हा देश निर्माण झाला. (१९४७)
२. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. (१८६२)
३. कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. (१८६२)
४. जपानने पहिले पेटंट धूळ मुक्त रंग तयार केल्याबद्दल दिले. (१८८५)
५. पहिल्यांदाच जागतिक स्तरावरील सौंदर्य स्पर्धा  फोलकस्टन इंग्लंड येथे आयोजित करण्यात आली. (१९०८)
६. चीनने जर्मनी आणि ऑस्ट्रिया सोबत युद्ध पुकारले. (१९१७)
७. नागपूर विद्यापीठाने स्वातंत्रवीर सावरकर यांना डी. लिट. ही पदवी दिली. (१९४३)
८. पाकिस्तानच्या विरोधी पक्ष नेत्या बेणेझिर भुट्टो यांनी सरकार विरोधी निदर्शने केल्या कारणे त्यांना अटक केली या निदर्शनास हिंसक वळण लागून चार लोकाचा मृत्यू झाला. (१९८६)
९. अणुबॉम्ब हल्ल्या नंतर झालेल्या प्रचंड नुकसानीमुळे जपानने शरणागती पत्करली आणि त्यानंतर दुसऱ्या महायुद्धाचा शेवट झाला. (१९४५)
१०. मोटर वाहन नोंदणी प्रमाणपत्र सुरू करणारा फ्रान्स हा पहिला देश झाला. (१८९३)

महत्व

१. World Lizard Day
२. Social Security Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...