मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १ सप्टेंबर || Dinvishesh 1 September ||




जन्म

१. पी. ए. संगमा, मेघालयाचे मुख्यमंत्री (१९४७)
२. मनोज पाहवा, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६३)
३. फ्रान्सिस विल्यम अस्टोन, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१८७७)
४. राम कपूर ,भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेते (१९७३)
५. अब्दूर रहमान बिस्वास, बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष (१९२६)
६. शिवाजीराव देशमुख, भारतीय राजकीय नेते (१९३५)
७. रोह मू - ह्यून, दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष (१९४६)
८. पद्मा लक्ष्मी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७०)
९. दुष्यंत कुमार, भारतीय लेखक (१९३३)
१०. जोस मारिया कॅस्ट्रो माद्रिझ , कोस्टा रिकाचे राष्ट्राध्यक्ष (१८१८)
११. माधव मंत्री, भारतीय क्रिकेटपटू (१९२१)
१२. रवींद्र मोहापात्रा, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (१९४४)


मृत्यू

१. गुरू राम दास , शिखांचे चौथे गुरू (१५८१)
२. थॉमस जे. बाटा, बाटा कंपनीचे संस्थापक (२००८)
३. हस्केल क्युरी, अमेरिकन गणितज्ञ (१९८२)
४. अनिल कुमार दत्ता, भारतीय लेखक (२००६)
५. मॉरिस कॉर्नोविस्की, अमेरिकन अभिनेते (१९९२)
६. सत महाजन, भारतीय राजकीय नेते (२०१२)
७. बी. व्ही. करंथ, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (२००२)
८. टॉमी मॉरिसन, अमेरिकन बॉक्सर (२०१३)
९. काशिनाथ त्र्यंबक तेलंग, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू (१८९३)
१०. किस पोस्थुमुस, डच रसायनशास्त्रज्ञ (१९७२)

घटना


१. भारतीय आयुर्विमा (LIC) महामंडळाची स्थापना करण्यात आली. (१९५६)
२. बल्गेरियाने रोमानिया सोबत युद्ध पुकारले. (१९१६)
३. त्रिपुरा हे भारताचे एक राज्य बनले. (१९५६)
४. पश्चिम इराणमध्ये झालेल्या तीव्र भूकंपात १००००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९६२)
५. लिबियात उठाव झाला, मुअम्मर गद्दाफी सत्तेवर आला. (१९६९)
६. उझबेकिस्तानला सोव्हिएत युनियन पासून स्वातंत्र्य मिळाले. (१९९१)
७. योकोहम आणि टोकियो मध्ये आलेल्या तीव्र भूकंपात १,००,०००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९२३)
८. रशियातील सेंट पीटर्सबर्ग शहराचे नाव बदलून पेट्रोग्राड ठेवण्यात आले. (१९१४)

महत्व

१. World Letter Writing Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...