मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष ९ जुलै || Dinvishesh 9 July ||




जन्म

१. सुखबीर सिंघ बादल, भारतीय राजकीय नेते (१९६२)
२. रामभाऊ म्हाळगी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक (१९२१)
३. प्योट्र कापित्सा, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८९४)
४. एडवर्ड हेथ, ब्रिटीश पंतप्रधान (१९१६)
५. बेन मोट्टेल्सन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९२६)
६. व्हिक्टर यानुकोविच, युक्रेनचे पंतप्रधान (१९५०)
७. संजीव कुमार, भारतीय चित्रपट अभिनेते (१९३८)
८. तब्बसुम, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९४४)
९. गुरू दत्त, भारतीय चित्रपट दिग्दर्शक निर्माता, अभिनेते (१९२५)
१०. जनरल लच्छामानसिंग लेहल, भारतीय सैन्य अधिकारी (१९२३)

मृत्यू

१. रफिक झकेरिया, भारतीय राजकीय नेते (२००५)
२. झाचेरी टेलर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१८५०)
३. युगेन फिश्चर, नाझी भौतिकशास्त्रज्ञ (१९६७)
४. वर्डिस फिषेर, अमेरिकन लेखक (१९६८)
५. प्रा. ह. भ. प. शंकर वामन, सार्थ ज्ञानेश्वरीचे लेखक (१९६८)
६. एस. एफ. हसनैन, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९५६)
७. लॉरेन्स जेनिफर, अमेरिकन लेखक (२००२)
८. जेसिका अँडरसन, ऑस्ट्रेलियन लेखिका (२०१०)
९. अॅमेडिओ अॅव्होगॅड्रो, इटालियन रसायनशास्त्रज्ञ  (१८५६)
१०. रांजोन घोषाल, भारतीय नात्यदिग्दर्शक , संगितकार (२०२०)

घटना

१. विंबल्डन चॅम्पियनशिपची सुरुवात झाली. (१८७७)
२. मुंबई शेअर बाजाराची सुरुवात एका वडाच्या झाडाखाली झाली. (१८७३)
३. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषीत करण्यात आला. (१९६९)
४. नोबेलियम या रासायनिक घटकाचा शोध लावल्याचे आल्फ्रेड नोबेल यांनी घोषीत केले. हा रासायनिक घटक आवर्तसारणी मध्ये १०२ नंबरवर स्थान मिळवता झाला.(१९५७)
५. पियरे तृदेयु हे कॅनडाचे पंतप्रधान झाले. (१९७४)
६. दक्षिण सुदान या देशाची सुदान या देशातून फाळणी करून निर्मिती करण्यात आली. (२०११)
७. जोको विडोदो हे इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (२०१४)


महत्त्व

१. Call of The Horizon Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...