मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष ८ जुलै || Dinvishesh 8 July ||




जन्म

१. ज्योती बसू, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री (१९१४)
२. सौरव गांगुली, भारतीय क्रिकेटपटू (१९७२)
३. हेन्री कार्टन, फ्रेंच गणितज्ञ (१९०४)
४. नीतू सिंग, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९५८)
५. गोपाळ नीलकंठ दांडेकर, भारतीय मराठी लेखक साहित्यिक (१९१६)
६. वाय. एस. राजशेखर रेड्डी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री (१९४९)
७. गंगा प्रसाद, सिक्कीमचे राज्यपाल (१९३७)
८. जॉन पंबरटन, कोका कोलाचे निर्माता (१८३१)
९. बनारसी दास, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री (१९१२)
१०. गिरीराज किशोर, पद्मश्री पुरस्कार विजेते लेखक (१९३७)

मृत्यू

१. चंद्रा शेखर, भारताचे आठवे पंतप्रधान (२००७)
२. बाळकृष्ण बोरकर, पद्मश्री पुरस्कार विजेते लेखक (१९८४)
३. ह. श्री. शेणोलीकर, संत साहित्य अभ्यासक (२००३)
४. अशोका गुप्ता, भारतीय समाजसेविका , महिला सेवा समितीच्या संस्थापिका (२००८)
५. जोसेफ वॉर्ड, न्युझीलंडचे पंतप्रधान (१९३०)
६. सय्यद ईश्तियाक अहमद तथा सुरमा भोपाली, भारतीय चित्रपट अभिनेते (२०२०)
७. किमसुंग दूसरे , उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष (१९९४)
८. सिन-इतिरो टोमोनगा, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९७९)
९. सिमोन कुझनेट्स, नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ (१९८५)
१०. बाबासाहेब मिरजकर, प्रसिद्ध तबला वादक (२००१)
११. राजा राव, भारतीय लेखक (२००६)
१२. लालदेंगा, मिझोरमचे मुख्यमंत्री (१९९०)

घटना

१. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी "मोरिया" या जहाजातून फ्रान्समधील मार्सेलच्या समुद्रात उडी घेतली. (१९१०)
२. फ्रांसने प्रशिया विरुद्ध युद्ध पुकारले. (१७९२)
३. वॉल स्ट्रीट जर्नल हे अमेरिकेचे वृत्तपत्र प्रकाशित होण्यास सुरुवात झाली. (१८८९)
४. रुपयाचे नवीन चिन्ह असलेले नाणे प्रकाशित करण्यात आले. (२०११)
५. आल्फ्रेड कार्लटन गिल्बर्ट यांनी एरेक्टर सेटचे पेटंट केले. (१९१३)
६. मशिनगणचे पेटंट चार्ल्स बर्ण यांनी केले. (१८५६)
७. कार्लोस सैल मेनुम हे अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९८९)

महत्व

१. Coca cola Day
२. राष्ट्रीय कन्या दिवस

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...