मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष ७ जुलै || Dinvishesh 7 July ||




जन्म

१. महेंद्रसिंह धोनी, भारतीय क्रिकेटपटू (१९८१)
२. ठाकूर रामलाल, आंध्र प्रदेशचे राज्यपाल (१९२९)
३. कॅमिल्लो गोल्गी, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८४३)
४. प्रा. लक्ष्मण जोग, भारतीय लेखक (१९२३)
५. कैलाश खेर, भारतीय गायक (१९७३)
६. अनिल बिस्वास, भारतीय संगीतकार (१९१४)
७. अकबर खान , भारतीय चित्रपट अभिनेते (१९४९)
८. पद्माकांत शुक्ला, भारतीय खगोलशास्त्रज्ञ (१९५०)
९. राधिका रॉय, भारतीय पत्रकार, NDTV च्या सहसंस्थापिका (१९४९)
१०. गुरू हर किशन साहिब जी, शिखांचे आठवे गुरू (१६५६)

मृत्यू

१. विक्रम बत्रा, भारतीय सैन्य अधिकारी (१९९९)
२. मोषे शारेट्ट, इस्राएलचे पंतप्रधान (१९५६)
३. रघुराज बहादुर, भारतीय गणितज्ञ (१९९७)
४. रसिका जोशी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (२०११)
५. जॉफ्रे फ्रीमन, लेखक (१९९५)
६. गुत्साव हैनेमांन, पश्चिम जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष (१९७६)
७. गॉटफ्रीड बेंन, जर्मन लेखक (१९५६)
८. सी. केसवान, भारतीय राजकीय नेते (१९६९)
९. भक्ती हृदया बाॅन, भारतीय धर्मगुरु (१९८२)
१०. सर आर्थर कॉनन डायल, स्कॉटिश लेखक (१९३०)

घटना

१. भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना पुणे येथे करण्यात आली. (१९१०)
२. इसाक न्यूटन यांना मास्टर ऑफ आर्ट्स ही पदवी केंब्रिज विद्यापीठातून मिळाली. (१६६८)
३. सॉलोमन द्वीपसमूह ब्रिटीश सत्तेतून स्वतंत्र झाला. (१९७८)
४. शीख साम्राज्याचे महाराजा रणजितसिंह यांच्या सैन्याने लाहोरला वेढा घातला. (१७९९)
५. न्युझीलंड कामगार पार्टीची स्थापना झाली. (१९१६)
६. इराणमध्ये शरिया कायदा लागू करण्यात आला. (१९८०)
७. हवाई बेटानी अमेरिकेचे सार्वभौमत्व मान्य केले. (१८९८)
८. कावसजिदावर यांनी मुंबईत कापड गिरणी सुरू केली. (१८५४)

महत्व

१. World Chocolate Day
२. World Forgiveness Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...