मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष ५ जुलै || Dinvishesh 5 July ||




जन्म

१. रामविलास पासवान, भारतीय राजकीय नेते (१९४६)
२. नवल किशोर शर्मा , गुजरातचे राज्यपाल (१९२५)
३. ए. इ. डग्लास, अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ (१८६७)
४. विल्लेम द्रिस, नेदरलँड्सचे पंतप्रधान (१८८६)
५. आनंद साधले, भारतीय लेखक साहित्यिक (१९२०)
६. के. करूनाकरण, केरळचे मुख्यमंत्री (१९१८)
७. साहेब रामराव खंदारे, भारतीय मराठी लेखक (१९६२)
८. जॉर्जस पोंपिडाऊ, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान (१९११)
९. झायेद खान, भारतीय चित्रपट अभिनेते (१९८०)
१०. ग्यूला हॉर्न, हंगेरियाचे पंतप्रधान (१९३२)
११. गेरार्ड हूफ्ट, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९४६)
१२. अभय अष्टेकर, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (१९४९)
१३. सुसान वोजविस्ककी, यूट्यूबच्या सीईओ  (१९६८)
१४. राकेश झुनझुनवाला , भारतीय उद्योगपती (१९६०)

मृत्यू

१. बाबुराव अर्णाळकर, भारतीय लेखक (१९९६)
२. अल्ब्रेच्ट कोसेल, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९२७)
३. थिरूनालुर करूनाकरन, भारतीय मल्याळम लेखक कवी (२००६)
४. शुभेंदू चट्टोपाध्याय, भारतीय बंगाली चित्रपट अभिनेते (२००७)
५. जॉन कर्टिन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान (१९४५)
६. वसंत शिंदे, भारतीय मराठी चित्रपट अभिनेते (१९९९)
७. जॉर्ज दे हेवेसी, नोबेल पारितोषिक विजेते रेडिओकेमिस्ट (१९६६)
८. ह्युघ शेरेर, जमैकाचे पंतप्रधान (२००४)
९. लाला दीन दयाल, भारतीय सुप्रसिद्ध छायाचित्रकार (१९०५)
१०. बाळू गुप्ते, भारतीय क्रिकेटपटू (२००५)

घटना

१. आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. (१९५४)
२. व्हेनेझुएला स्पेनपासून स्वतंत्र देश झाला. (१८११)
३. पाकिस्तानमध्ये लष्कराने बंड पुकारले, झुल्फिकार अली भुट्टो यांना तुरुंगात  डांबले. (१९७७)
४. नेदरलँड येथे पहिल्यांदाच सार्वत्रिक निवडणुका झाल्या. (१९२२)
५. बीबीसीने पहिल्यांदाच टेलिव्हिजनवर बातम्यांचे बुलेटिन प्रकाशित केले. (१९५४)
६. मंगोलियाने आपले संविधान स्वीकारले. (१९६०)
७. जेफ बेझोस यांनी Amazon.com ची सुरूवात केली. (१९९४)
८. इराक मधील बगदाद येथे झालेल्या बॉम्ब स्फोटात १५हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१३)
९. गणपतराव बोडस, गोविंदराव टेंबे आणि बालगंधर्व यांनी मिळून "गंधर्व नाटक मंडळींची" स्थापना केली. (१९१३)

महत्व

१. Mechanical Pencil Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...