मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष ४ जुलै || Dinvishesh 4 July ||




जन्म

१. गुलजारीलाल नंदा, भारताचे दुसरे पंतप्रधान (१८९८)
२. गिरिजा प्रसाद कोईराला, नेपाळचे पंतप्रधान (१९२४)
३. स्टीफन फोस्टर, अमेरीकन संगीतकार (१८२६)
४. वि. आ. बुवा, भारतीय लेखक (१९२६)
५. नीना गुप्ता, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९५९)
६. केल्विन कोलिड्ज, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१८७२)
७. पंडीत निवृत्तीबुवा सरनाईक, भारतीय गायक (१९१२)
८. गेरार्ड डेब्रेऊ, नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ (१९२१)
९. पी. सावळाराम, भारतीय लेखक ,कवी (१९१४)
१०. नसीम बानू, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९१६)
११. श्रद्धा पंडीत, भारतीय गायिका (१९८२)
१२. नानक सिंघ, भारतीय पंजाबी लेखक कवी (१८९७)
१३. ऑस्टिन रिचर्ड पोस्ट, अमेरिकन गायक, संगीतकार (१९९५)

मृत्यू

१. स्वामी विवेकानंद, भारतीय तत्ववेत्ता, भारतीय संस्कृती प्रचारक (१९०२)
२. जॉन अडमस्, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१८२६)
३. कान्होजी आंग्रे, हिंदवी स्वराज्याचे आरमारप्रमुख (१७२९)
४. पिंगाली वेंकय्या, भारतीय ध्वजाचे रचनाकार (१९६३)
५. वसंत शिंदे , भारतीय चित्रपट अभिनेते (१९९९)
६. स्वामी प्रभावानंदा, भारतीय धर्मगुरु (१९७६)
७. थॉमस जेफरसन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१८२६)
८. हिरेन भट्टाचार्य, भारतीय लेखक ,कवी (२०१२)
९. जेम्स मोनरे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१८३१)
१०. मेरी क्युरी, पहिल्या महिला नोबेल पारितोषिक विजेत्या वैज्ञानिक (१९३४)
११. ऑस्कर झरिस्की, रशियन गणितज्ञ (१९८६)
१२. रघुनाथ वामन दिघे, भारतीय कादंबरीकार (१९८०)

घटना

१. अमेरिका ब्रिटीश सत्तेतून बाहेर पडून स्वतंत्र देश झाला. (१७७६)
२. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या एकांतवासास सुरुवात झाली. (१९११)
३. विल्यम पॅट्टी हे ग्रेट ब्रिटनचे पंतप्रधान झाले. (१७८२)
४. फ्रेंच सैन्याने अॅमस्टरडॅम काबीज केले. (१८१०)
५. कारगिल मधील द्रासमध्ये टायगर हिल्स हा प्रदेश भारतीय लष्कराच्या १८ व्या बटालीयनने आपल्या काबीज केला व सर्व घुसखोरांना हाकलून लावले. (१९९९)
६. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हा पुतळा फ्रान्सने अमेरिकेला भेट केला. (१८८६)
७. लिओ झिलार्ड यांनी अटोमिक बॉम्बच्या चैन रिअँक्शनचे पेटंट केले. (१९३४)
८. हॉट मेलची फ्री ईमेल सर्व्हिस सुरू झाली. (१९९६)
९. नासाचे जुनो हे अंतराळयान यशस्वीरित्या गुरू या ग्रहाच्या कक्षेत प्रक्षेपित झाले. (२०१६)


महत्व

१. Independance Day Of America
२. Jackfruit Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...