मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष ३० जुलै || Dinvishesh 30 July ||




जन्म

१. सोनू सूद, भारतीय चित्रपट अभिनेते, समाजसेवक (१९७३)
२. मुथूलक्ष्मी रेड्डी, पद्मभूषण भारतीय राजकीय नेत्या, समाजसुधारक (१८८६)
३. मंदाकिनी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९६३)
४. हेन्री फोर्ड, फोर्ड कंपनीचे संस्थापक (१८६३)
५. सोनू निगम, भारतीय गायक (१९७३)
६. पॅट्रिक मोडिनी, नोबेल पारितोषिक विजेते लेखक साहित्यिक (१९४५)
७. सुलोचना लटकर, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९२८)
८. सुधीर मुनगंटीवार, भारतीय राजकीय नेते (१९६२)
९. अरनॉल्ड श्वार्जनेगर, अमेरिकन अभिनेते, शरीरसौष्ठपटू , कॅलिफॉर्नियाचे राज्यपाल (१९४७)
१०. सीस राम ओला, भारतीय राजकीय नेते (१९२७)


मृत्यू

१. वसंतराव देशपांडे , भारतीय शास्त्रीय गायक (१९८३)
२. संत तुलसीदास (१६२२)
३. गंगाधर बाळकृष्ण देशपांडे, भारतीय स्वातंत्र्य सैनिक, कर्नाटक सिंह (१९६०)
४. धीरूभाई देसाई, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९९०)
५. जॉयके किल्मर, अमेरिकन लेखक कवी (१९१८)
६. शंकर पाटील, भारतीय चित्रपट पटकथा लेखक, मराठी साहित्यिक (१९९४)
७. जोसेफ कूक, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान (१९४७)
८. बेंजामिन वॉकर, भारतीय लेखक कवी (२०१३)
९. सिद्धार्थ भराथण, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९९८)
१०. जॉन गॅम्पर, बार्सिलोना फुटबॉल क्लबचे संस्थापक (१९३०)

घटना

१. अपोलो १५ हे अंतराळयान चंद्रावर यशस्वीरीत्या उतरले. (१९७१)
२. उरुग्वे देशाने पहिला फुटबॉल विश्वकप जिंकला. (१९३०)
३. नाझी जर्मनी सैन्याने २५,०००हून अधिक ज्यू लोकांना मिंस्क बेलोरूसिया येथे मारले. (१९४२)
४. बगदाद या शहराची स्थापना खलिफा अल मन्सूरने केली. (७६२)
५. पुणे जिल्ह्यातील माळीण या गावावर पडलेल्या दरडीमध्ये ५० लोक ठार झाले. (२०१४)
६. बेल्जियम संसदेत वंशवाद विरोधात कायदा मंजूर करण्यात आला. (१९८१)
७. तामिळनाडू एक्स्प्रेस रेल्वेच्या स्लीपर कोचला नेल्लोरे, आंध्र प्रदेश येथे लागलेल्या आगीमुळे ३२ प्रवाशांना आपला जीव गमावावा लागला तर २७ प्रवाशी जखमी झाले. (२०१२)
८. दिल्लीमध्ये पॉवर ग्रीड खराब झाल्यामुळे उत्तर भारतातील ३० कोटी वीजग्राहकांची वीज खंडित झाली. (२०१२)
९. इटली मध्ये नेपल्स शहरात झालेल्या तीव्र भूकंपात १००००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१६२९)
१०. मामणून हुसैन हे पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झाले. (२०१३)

महत्व

१. World Snorkeling Day
२. World Day Against Trafficking In Persons

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...