मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष ३ जुलै || Dinvishesh 3 July ||




जन्म

१. तिग्मांशू धुलिया, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६७)
२. हरभजन सिंग, भारतीय क्रिकेटपटू (१९८०)
३. भारती सिंघ,भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेत्री (१९८६)
४. ज्युलियन असांज, विकीलिक्सचे संस्थापक (१९७१)
५. रिचर्ड बेडफोर्ड बेणेट्ट, ब्रिटीश पंतप्रधान (१८७०)
६. सेल्लापण रामनाथन, सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष (१९२४)
७. सुनिता देशपांडे, भारतीय स्वातंत्र्य सेनानी, लेखिका (१९२६)
८. श्रीपाद गोविंद नेवरेकर, भारतीय मराठी रंगभूमी कलाकार,गायक (१९१२)
९. व्ही. रंगारा राव, भारतीय चित्रपट दिग्दर्शक निर्माता (१९१८)
१०. मामा परमानंद, प्रार्थना समाजाचे सहसंस्थापक (१८३८)
११. टॉम क्रुज, हॉलिवूड चित्रपट अभिनेते (१९६२)
१२. भाऊसाहेब तारकुंडे, भारतीय स्वातंत्र्य सेनानी, कायदेपंडित (१९०९)
१३. लुडविग गुटमन, जर्मन न्युरोलाॅजीस्ट (१८९९)

मृत्यू

१. स्वरणाकुमारी देवी, भारतीय बंगाली लेखिका कवयित्री (१९३२)
२. संत नामदेव महाराज यांनी समाधी घेतली. (१३५०)
३. हिपोलीतो य्रिगोयन, अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष (१९३३)
४. मंगलोर रंगा पै, भारतीय पत्रकार लेखक (२००३)
५. जिम मॉरिसन, अमेरिकन गायक , संगीतकार (१९७१)
६. राज कुमार, भारतीय चित्रपट अभिनेते (१९९६)
७. पिटर हेंनिपमन, डच अर्थतज्ञ (१९९४)
८. सिगफ्रीड हांडलोजर, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (१९५४)
९. विल्यम जोनस, अमेरिकन गणितज्ञ (१७४९)
१०. क्विंटन मॅकमिलन, साऊथ आफ्रिकेचे क्रिकेटपटू (१९४८)

घटना

१. सुधीर फडके यांना महाराष्ट्र राज्य सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला. (२००१)
२. स्वीडन आणि डेन्मार्क मध्ये शांतता करार झाला. (१७२०)
३. प्रशियाने ऑस्ट्रिया सोबत युद्ध पुकारले. (१७७८)
४. आयडाहो हे अमेरिकेचे ४३वे राज्य बनले. (१८९०)
५. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना ब्रिटीश सरकारने आपल्या केसरी या वृत्तपत्रात ब्रिटीश सरकारच्या विरुद्ध लिहिल्या बद्दल अटक केली. (१९०८)
६. भारतात कायदे शिक्षणास सुरुवात झाली. (१८५५)
७. महात्मा फुले यांनी दलित मुलांसाठी पहिली शाळा सुरू केली. (१८५२)

महत्व

१. International Plastic Bag Free Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...