मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २८ जुलै || Dinvishesh 28 July ||




जन्म

१. कासू ब्रह्मानंद रेड्डी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री (१९०९)
२. आयेशा झुल्का, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७२)
३. हेन्री जस्पर, बेल्जियमचे पंतप्रधान (१८७०)
४. अल्बर्टो फुजीमोरी, पेरुचे राष्ट्राध्यक्ष (१९३८)
५. हुमा कुरैशी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८६)
६. अनिल जोशी, भारतीय गुजराती लेखक कवी (१९४०)
७. जिम डॅविस ,अमेरिकन कार्टूनिष्ट (१९४५)
८. केशवराम काशिराम शास्त्री, विश्व हिंदू परिषदेचे सहसंस्थापक (१९०५)
९. हुगो चावेज, व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष (१९५४)
१०. रामेश्वर ठाकूर, मध्यप्रदेशचे राज्यपाल (१९२७)

मृत्यू

१. बाबुराव गोखले, भारतीय नाटककार (१९८१)
२. लीला नायडू, भारतीय चित्रपट अभिनेत्री (२००९)
३. जॅन काप्पेये व्हॅन दे कॉपेलो, नेदरलँड्सचे पंतप्रधान (१८९५)
४. पंडीत राव नगरकर, भारतीय अभिनेते ,गायक (१९७७)
५. ऑटो हान, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९६८)
६. राजा ठाकूर, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९७५)
७. अल्लवर गुलस्त्रंड, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९३०)
८. चारू मुजुमदार, भारतीय राजकीय नेते, परिवर्तनकार (१९७२)
९. रवी कोंडला राव, भारतीय तमिळ चित्रपट दिग्दर्शक निर्माता (२०२०)
१०. ट्रीग्वे हावेल्मो, नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ (१९९९)
११. लुईस टँक्रेड, दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेटपटू (१९३४)
१२. आर्चर जॉन पोर्टर मार्टिन, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (२००२)
१३. फ्रान्सिस क्रीक, नोबेल पारितोषिक विजेते जीवशास्त्रज्ञ (२००४)
१४. महाश्वेता देवी, भारतीय लेखिका (२०१६)

घटना

१. चौधरी चरणसिंग हे भारताचे पाचवे पंतप्रधान झाले. (१९७९)
२. पेरूने स्पेन सत्तेतून बाहेर पडून आपले स्वातंत्र्य घोषीत केले. (१८२१)
३. सर विल्यम हर्सचेल यांनी मानवी अंगठ्याचे ठसे हे व्यक्तीची ओळख म्हणून शासकीय कार्यपद्धतीत वापरण्यास सुरुवात केली. (१८५८)
४. चीनमध्ये तांगशान या प्रांतात झालेल्या तीव्र भूकंपात २५०००० हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर १५००००हून अधिक लोक जखमी झाले. (१९७६)
५. बापूजी अणे व पंडीत मदनमोहन मालवीय यांनी काँग्रेस राष्ट्रीय पक्षाची स्थापना केली. (१९३४)
६. युनायटेड किंग्डमने पिनकोड पद्धत वापरण्यास सुरुवात केली. (१९५९)
७. दुसऱ्या महायुध्दात जर्मनी मधील हॅम्बूर्ग शहरावर रॉयल एअर फॉर्सने केलेल्या बॉम्ब हल्ल्यात सुमारे ४५०००लोक मृत्यूमुखी पडले. (१९४३)
८. अॅलन गार्सिया यांनी पेरूच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. (१९८५)
९. लेखिका आसिमा गोस्वामी यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. (२००१)

महत्व

१. World Nature Conservation Day 
२. World Hepatitis Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...