मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २७ जुलै || Dinvishesh 27 July ||




जन्म

१. उद्धव ठाकरे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख (१९६०)
२. गिओसू कॅरडक्सी, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१८३५)
३. असिफ बसरा,भारतीय चित्रपट अभिनेते (१९६७)
४. हनस फिश्चेर, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१८८१)
५. क्रिती सेनन, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९९०)
६. मंदार चांदवडकर, भारतीय टेलिव्हिजन अभिनेते (१९७६)
७. डॉ. पां. वा. सुखात्मे, भारतभूषण पुरस्काराने सन्मानित, गणितज्ञ (१९११)
८. राहुल बोस, भारतीय चित्रपट अभिनेते दिग्दर्शक, पटकथा लेखक (१९६७)
९. पॉल माईकल लेवेस्क्वे, ट्रिपल एच, अमेरिकन कुस्तीगीर (१९६९)
१०. रींके खन्ना, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७७)
११. रामदास कदम, भारतीय राजकीय नेते (१९६३)
१२. योहान बर्नोली, स्विस गणितज्ञ (१६६७)


मृत्यू

१. क्रिशन कांत, भारताचे १०वे उपराष्ट्रपती (२००२)
२. अमजद खान, भारतीय चित्रपट अभिनेते (१९९२)
३. जॉन डेल्टन, इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ (१८४४)
४. एमिल थिऑडोर कोचर, नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर (१९१७)
५. बळवंत लक्ष्मण वष्ट, हिंदुत्ववादी कार्यकर्ते (१९९७)
६. रवी बस्वनी, भारतीय चित्रपट अभिनेते (२०१०)
७. वामन दत्तात्रय पटवर्धन, भारतीय शस्त्रास्त्र तज्ञ (२००७)
८. इसाबेल डीन, अमेरिकन अभिनेत्री (१९९७)
९. सलीम अली, भारतीय पक्षी विज्ञानी (१९९०)
१०. मामासाहेब देवगिरीकर, भारतीय राजकीय नेते (१९७५)

घटना

१. पहिल्या प्रवासी जेट विमान डी हॅविलीलॅंड कोमेटचे पहिले उड्डाण झाले. (१९४९)
२. रशिया आणि तुर्की मध्ये शांतता करार झाला. (१७१३)
३. सर्व सार्वजनिक ठिकाणे , शासकीय इमारती येथे सिगारेट तसेच तत्सम पदार्थांच्या जाहिरातीवर बंदी घालण्याचा निर्णय महाराष्ट्र मंत्रिमंडळाने घेतला. (२००१)
४. इंटरनॅशनल जॉग्राफिकल युनियनची स्थापना करण्यात आली. (१९२२)
५. यांगट्झी जियांग या चीनमधील नदीला आलेल्या पुरात २०००००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९३५)
६. जर्मन सैन्य युक्रेन मध्ये दाखल झाले. (१९४१)
७. ऑस्ट्रियामधील सैन्य सर्व दोस्त राष्ट्रांनी काढून घेण्यास सुरुवात केली. (१९५५)
८. अमीन अल हफेझ हे सीरियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९६३)


महत्व

१. Barbie In A Blender Day
२. Cross Atlantic Communication Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...