मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २५ जुलै || Dinvishesh 25 July ||




जन्म

१. सोमनाथ चॅटर्जी, भारतीय राजकीय नेते (१९२९)
२. वसंत बापट, भारतीय मराठी साहित्यिक कवी लेखक (१९२२)
३. सुधीर फडके, भारतीय गायक, संगीतकार (१९१९)
४. हरसिम्रत कौर बादल, भारतीय राजकीय नेत्या (१९६६)
५. इलियास कॅनेट्टी, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१९०५)
६. कृष्णन नायर, जयन, भारतीय चित्रपट अभिनेते (१९३९)
७. सेम्मंगुडी श्रीनिवासा अय्यर, भारतीय गायक (१९०८)
८. जिम कॉर्बेट, ब्रिटीश वंशीय भारतीय वन्यजीवशास्त्रज्ञ (१८७५)
९. योगेंद्र टिकू, भारतीय चित्रपट अभिनेते (१९५३)
१०. सुधीर काकर, भारतीय मनोविश्लेषक (१९३८)
११. रोसलींड फ्रँकलिन, इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ (१९२०)
१२. फ्रान्सिस अरनॉल्ड, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९५६)


मृत्यू

१. फुलन देवी, भारतीय राजकीय नेत्या (२००१)
२. गणेश वासुदेव जोशी, भारतीय समाजसुधारक (१८८०)
३. व्ही. एस. कृष्णा अय्यर, भारतीय स्वातंत्र्यसैनिक , राजकीय नेते (२०११)
४. बी. आर. इशारा, भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक (२०१२)
५. लुईस लॉरेंट, कॅनडाचे पंतप्रधान (१९७३)
६. शिवरामपंत दामले, महाराष्ट्र मंडळ, पुणे संस्थापक (१९७७)
७. स्टॅन्ली मिडलटन, ब्रिटीश लेखक (२००९)
८. अरुण नेहरु, भारतीय राजकीय नेते, पत्रकार (२०१३)
९. बेजी केड इसेबसी, टूनिशियाचे राष्ट्राध्यक्ष (२०१९)
१०. आर. एस. गवई, भारतीय राजकीय नेते (२०१५)

घटना

१. श्रीमती प्रतिभाताई पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या. (२००७)
२. चीन आणि जपान मध्ये युद्ध सुरू झाले. (१८९४)
३. वॉल्टर हंट यांनी पेपर शर्ट कॉलरचे पहिले अमेरीकन पेटंट केले. (१८५४)
४. कॅनडा या देशात आयकर लागू करण्यात आला. (१९१७)
५. जगातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी लुईस जॉन ब्राऊन ही इंग्लंडमध्ये जन्मास आली. (१९७८)
६. विल्हेल्म सणाईडर यांनी कॅरौसेलचे पेटंट केले. (१८७१)
७. जॉर्डणने पॅलेस्टाईन सैन्यावर हल्ला केला. (१९५६)
८. खालिस्तानी समर्थकांनी पंजाब येथील मुकत्सर येथे बसवर हल्ला केला यामध्ये १५हून अधिक प्रवाशी मृत्यूमुखी पडले. (१९८६)
९. के. आर. नारायणन हे भारताचे १०वे राष्ट्रपती बनले. (१९९७)
१०. रामास्वामी वेंकटरमण हे भारताचे सातवे राष्ट्रपती बनले. (१९८७)
११. इविका दाडिक यांनी सर्बियाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली. (२०१२)
१२. रामनाथ कोविंद भारताचे १४वे राष्ट्रपती झाले. (२०१७)

महत्व

१. Red Shoe Day
२. Health And Happiness With Hypnosis Day
३. Carousel Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...