मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २४ जुलै || Dinvishesh 24 July ||




जन्म

१. सत्यपाल मलिक, मेघालयचे राज्यपाल (१९४६)
२. पन्नालाल घोष, भारतीय संगीतकार, बासरीवादक (१९११)
३. केशुभाई पटेल, गुजरातचे मुख्यमंत्री (१९२८)
४. फ्रान्सिस्को सोलानो लोपेझ, पराग्वेचे राष्ट्राध्यक्ष (१८२६)
५. मनोज कुमार, भारतीय चित्रपट अभिनेते (१९३७)
६. अझीम प्रेमजी, विप्रो कंपनीचे संस्थापक (१९४५)
७. तनुज महाशब्दे, भारतीय टेलिव्हिजन अभिनेते (१९७४)
८. मधुकर तोरडमल, भारतीय मराठी चित्रपट अभिनेते दिग्दर्शक लेखक (१९३२)
९. जेनिफर लोपेझ, अमेरिकन पॉप सिंगर, अभिनेत्री (१९६९)
१०. नरसिंम्हा राजू, भारतीय कन्नड चित्रपट अभिनेते (१९२३)
११. गौतम घोष, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९५०)
१२. गोविंदभाई श्रॉफ, हैद्राबाद मुक्तीसंग्राम स्वातंत्र्य सेनानी (१९११)
१३. फ्रेडरिक शॉटकी, जर्मन गणितज्ञ (१८५१)

मृत्यू

१. के. व्ही. रंगा रेड्डी, आंध्र प्रदेशचे उपमुख्मंत्री (१९७०)
२. उत्तम कुमार, भारतीय बंगाली चित्रपट अभिनेते (१९८०)
३. मार्टिन ब्युरेन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१८६२)
४. जेम्स चॅडविक, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९७४)
५. समित भंजा, भारतीय बंगाली चित्रपट अभिनेते (२००३)
६. फ्रिट्झ ए. लिपमन, नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ, संशोधक (१९८६)
७. गुर्रम जाशुवा, भारतीय तमिळ लेखक कवी (१९७१)
८. साव मौंग, म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष (१९९७)
९. ध्वरंम भावनारायणा राव, भारतीय व्हायोलिन वादक (२०००)
१०. रॉबर्ट लिडले, सिटीस्कॅन या यंत्राचे संशोधक (२०१२)
११. पिटर दी नरोन्हा,  भारतीय उद्योगपती (१९७०)

घटना

१. फ्रान्सने पहिल्यांदाच कॉपीराइट सुरक्षितता कायदा लागू केला. (१७९३)
२. गुलामगिरी प्रथा चीलिमध्ये संपुष्टात आली. (१८२३)
३. जगातली पहिली लहान मुलांसाठी रेल्वे सोव्हिएत युनियनने टबिलिसी येथे सुरू केली. (१९३५)
४. अपोलो ११ हे अंतराळयान पृथ्वीवर परतले. (१९६९)
५. महाश्वेता देवी, बंगाली लेखिका यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर करण्यात आला. (१९९७)
६. मोहम्मद अली रजई हे इराणचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९८१)
७. परकीय चलन व्यवस्थापन कायदा FEMA जारी करण्यात आला यापूर्वी परकीय चलन व्यवस्थापन कायदा FERA लागू होता. (१९९८)
८. शंकर दयाळ शर्मा हे भारताचे ९वे राष्ट्रपती म्हणून निवडून आले. (१९९२)
९. माली येथे विमान दुर्घटनेत १००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१४)
१०. विप्रो आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या विजयालक्ष्मी सुब्रह्मणम या पहिल्या महिला ग्रॅंन्डमास्टर झाल्या. (२०००)
११. रेऊवेन रिवलिन यांनी इस्राईलच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. (२०१४)

महत्व

१. International Self Care Day
२. Tell An Old Joke Day
३. Cousin's Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...