मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २३ जुलै || Dinvishesh 23 July ||




जन्म

१. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, भारतीय स्वातंत्र्य सेनानी, केसरीचे संपादक (१८५६)
२. मोहन आगाशे, भारतीय चित्रपट अभिनेते (१९४७)
३. गस्तव हैन्मेंन, पश्चिम जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष (१८९९)
४. लक्ष्मीबाई यशवंत , भारतीय चित्रपट, नाट्य अभिनेत्री (१९१७)
५. ताजुद्दिन अहमद, बांगलादेशचे पंतप्रधान (१९२५)
६. हिमेश रेशमिया, भारतीय गायक , संगीतकार , संगीत दिग्दर्शक (१९७३)
७. यजुवेंद्र चहल, भारतीय क्रिकेटपटू (१९९०)
८. वलादिमिर प्रेलोग, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९०६)
९. चंद्रशेखर आझाद, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१९०६)
१०. शिवकुमार बतालवी, भारतीय पंजाबी लेखक कवी (१९३६)
११. मिलिंद गुणाजी, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६१)
१२. तारासंकर बंदोपाध्याय, भारतीय बंगाली लेखक कवी (१८९८)
१३. सर्गिओ मत्तारेल्ला, इटलीचे राष्ट्राध्यक्ष (१९४१)
१४. नजीब रजाक, मलेशियाचे पंतप्रधान (१९५३)
१५. डॅनिएल रॅडक्लिफ, हॉलिवूड चित्रपट अभिनेते (१९८९)


मृत्यू

१. मेहमूद अली, भारतीय चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक (२००४)
२. यूलिसेस एस. ग्रँट, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१८८५)
३. लक्ष्मी सहगल, भारतीय आझाद हिंद सेना मधील कॅप्टन (२०१२)
४. वसुंधरा पंडीत, भारतीय शास्त्रीय गायिका (१९९७)
५. विल्यम रामस्येय, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९१६)
६. चार्ल्स दुपुय, फ्रान्सचे पंतप्रधान (१९२३)
७. कॉर्डेल हुल्ल, नोबेल पारितोषिक विजेते राजकीय नेते (१९५५)
८. हेन्री हल्लेट डॅले, नोबेल पारितोषिक विजेते शरीरक्रिया शास्त्रज्ञ (१९६८)
९. सुब्रमणिया सिवा, भारतीय तमिळ लेखक (१९२५)
१०. मंजुला विजयकुमार, भारतीय चित्रपट अभिनेत्री (२०१३)

घटना

१. हेपेटायटिस -बी या रोगावरील लसीच्या प्राथमिक वापरास सुरुवात करण्यात आली. (१९८६)
२. मुंबईमध्ये रेडिओ क्लबने पहिले रेडिओ प्रसारण केले, याचेच पुढे आकशावाणीत रूपांतरण करण्यात आले. (१९२७)
३. एलिजाह मॅककॉय यांनी वाफेच्या इंजिनासाठी लागणाऱ्या लुब्रिकेटरचे पेटंट केले. (१८७२)
४. अमेरिकन सैन्याने इटलीमधील पिसावर ताबा मिळवला. (१९४४)
५. पहिले Earth Resources Satellite यशस्वीरीत्या प्रक्षेपित करण्यात आले. (१९७२)
६. एल. टी. टी. इ. या श्रीलंकन संघटनेने श्रीलंकेच्या १३ सैनिकांची हत्या केली. (१९८३)
७. चंद्रा ही अंतराळातील सर्वात मोठी दुर्बिण केनेडी या अवकाश केंद्रावरून प्रक्षेपित करण्यात आली. (१९९९)
८. फोर्ड या कंपनीने आपली पहिली चारचाकी गाडी विकली. (१९०३)
९. इराकमध्ये झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटात १००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१२)
१०. बोरिस जॉन्सन हे ब्रिटीश सरकारचे नवीन पंतप्रधान झाले. (२०१९)

महत्व

१. World Sjogren Day
२. Sprinkle Day
३. Broadcast Day
४. वनसंवर्धन दिवस

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...