मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २२ जुलै || Dinvishesh 22 July ||




जन्म

१. देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (१९७०)
२. अजित पवार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री (१९५९)
३. पंडीत विनायकराव पटवर्धन, भारतीय शास्त्रीय गायक (१८९८)
४. मुकेश चंद माथूर, भारतीय संगीतकार (१९२३)
५. सी. व्ही. श्रीधर, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९३३)
६. गुस्ताव हर्ट्झ, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८८७)
७. मोहम्मद बिन राशिद अल मकटाउम, यूएईचे पंतप्रधान (१९४९)
८. अर्मान मलिक, भारतीय गायक (१९९५)
९. श्रीराम शंकर अभ्यंकर, भारतीय गणितज्ञ (१९३०)
१०. सेलेना गोमेझ, अमेरीकन गायिका, अभिनेत्री (१९९२)
११. विशाल मल्होत्रा, भारतीय चित्रपट अभिनेते (१९८१)
१२. सी. एच. भाभा, भारतीय उद्योगपती, राजकीय नेते (१९१०)
१३. गोविंद तळवलकर, महाराष्ट्र टाईम्सचे संपादक (१९२५)

मृत्यू

१. इंद्र लाल रॉय, भारतीय वैमानिक (१९१८)
२. विल्यम रॅन्डल क्रेमर, नोबेल पारितोषिक विजेते वकील, राजकीय नेते (१९०८)
३. ग. ल. ठोकळ, भारतीय साहित्यिक ,प्रकाशक (१९८४)
४. मॅकेंझि किंग, कॅनडाचे पंतप्रधान (१९५०)
५. हेमेण मुजुमदार, भारतीय चित्रकार (१९४८)
६. ज्युसेप्पे पियाझी, इटालियन खगोलशास्त्रज्ञ (१८२६)
७. एस्टेल्ले गेट्टी, अमेरिकन अभिनेत्री (२००८)
८. हेरॉल्ड लार्वूड, इंग्लिश क्रिकेटपटू (१९९५)
९. ए. जी. कृपाल सिंघ, भारतीय क्रिकेटपटू (१९८७)
१०. सोल्मिंन फ्रांजीह, लेबनॉनचे राष्ट्राध्यक्ष (१९९२)

घटना

१. ब्रिटीश सरकार विरुद्ध देशाचे दुर्दैव हा अग्रलेख लिहिल्याबद्दल लोकमान्य टिळकांना ६वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली. (१९०८)
२. क्राव्हेरो लोपेझ हे पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९५१)
३. पोलंडमध्ये कमुनिश्ट सत्तेची सुरुवात झाली. (१९४४)
४. वासुदेव बळवंत गोगटे यांनी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये सर जॉन हॉटसन या मुंबई प्रांताच्या राज्यपालावर गोळ्या झाडल्या, यामध्ये सर जॉन हाॅटसन वाचला. (१९३१)
५. प्रणब मुखर्जी हे भारताचे १३वे राष्ट्रपती बनले. (२०१२)
६. चीनमध्ये आलेल्या तीव्र भूकंपात ८०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले, ५००लोक जखमी झाले. (२०१३)

महत्व

१. Casual Pi Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...