मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १७ जुलै || Dinvishesh 17 July ||




जन्म

१. बाबुराव बागुल, भारतीय लेखक साहित्यिक (१९३०)
२. रवी किशन, भारतीय चित्रपट अभिनेते, राजकीय नेते (१९७१)
३. गाॅर्डोन गाऊल्ड, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ (१९२०)
४. अनन्या बिर्ला, भारतीय गायिका, उद्योगपती (१९९४)
५. स्नेहल भाटकर, भारतीय संगीतकार (१९१९)
६. बिजोन भट्टाचार्य, भारतीय चित्रपट अभिनेते लेखक (१९१७)
७. निर्मल जीत सिंग सेखोण, भारतीय सैन्य अधिकारी (१९४३)
८. झरीना वहाब, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९५९)
९. सुनील लनबा, भारतीय नौदल प्रमुख (१९५७)
१०. बेगम अबिदा अहमद, भारताच्या पहिल्या महिला, राष्ट्रपती फकृद्दीन अली अहमद यांच्या पत्नी (१९२३)

मृत्यू

१. आय. जी. पटेल, भारतीय अर्थतज्ञ, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर (२००५)
२. शांता हुबळीकर, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९९२)
३. सी. शेषाद्री, पद्मभूषण पुरस्कार विजेते अर्थतज्ञ (२०२०)
४. ऍडम स्मिथ, स्कॉटिश अर्थतज्ञ (१७९०)
५. चार्ल्स ग्रे, ब्रिटिश पंतप्रधान (१८४५)
६. कानन देवी, भारतीय चित्रपट अभिनेत्री गायिका (१९९२)
७. गिवोनी गिओलित्ती, इटलीचे पंतप्रधान (१९२८)
८. लालमानी मिश्रा, भारतीय संगीतकार (१९७९)
९. एडवर्ड हिथ, ब्रिटीश पंतप्रधान (२००५)
१०. मालती घोषाल, भारतीय गायिका (१९८४)

घटना

१. डिस्नेलॅन्डची सुरुवात वॉल्ट डिस्ने यांनी कॅलिफोर्निया येथे केली. (१९५५)
२. फिनलंडने संविधान स्वीकारले. (१९१९)
३. सोव्हिएत युनियनने चीन सोबत राजकीय संबंध तोडले. (१९२९)
४. लक्ष्मणशास्त्री जोशी यांना तेलगू थल्ली हा पुरस्कार देण्यात आला. (१९९३)
५. इस्राईल सैन्याने नझारेथ हे शहर काबीज केले. (१९४८)
६. थिओडोर हेऊसस हे पश्चिम जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९५४)
७. पियरे मॉरोय यांनी फ्रान्सच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. (१९८४)
८. भरतनाट्यम शिखरमणी पुरस्कार भारतीय चित्रपट अभिनेत्री  वैजयंतीमाला बाली यांना देण्यात आला. (२०००)
९. चीनमध्ये आलेल्या पुरात ५८लोक मृत्यूमुखी पडले. (२०१३)
१०. मुंबई येथून जलवाहतूक करणारी बोट बुडून ७०० लोक मृत्यूमुखी पडले. (१९४७)

महत्व

१. World Emoji Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...