मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १६ जुलै || Dinvishesh 16 July ||




जन्म

१. के. व्ही. कृष्णराव, भारताचे भूदल प्रमुख (१९२३)
२. धनराज पिल्ले, भारतीय हॉकी खेळाडू (१९६८)
३. अरुणा असिफ अली, भारतरत्न स्वातंत्र्यसेनानी (१९०९)
४. कतरीना कैफ, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८३)
५. वा. कृ. चोरघडे, भारतीय मराठी साहित्यिक (१९१४)
६. बबिता मंडलिक, भारतीय महिला क्रिकेटपटू (१९८१)
७. फ्रित्स झर्निके, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८८८)
८. आयर्विन रोज, नोबेल पारितोषिक विजेते जैववैज्ञानिक (१९२६)
९. टी. आर. सुंदरम, भारतीय चित्रपट अभिनेते दिग्दर्शक निर्माता (१९०७)
१०. द्विजेंद्रलाल रे, भारतीय बंगाली लेखक कवी (१८६४)
११. लैरी सेनजर, विकिपिडियाचे सहसंस्थापक (१९६८)

मृत्यू

१. डी. के. पत्तमल, भारतीय गायिका (२००९)
२. के. व्ही. सुब्बांना, भारतीय कन्नड लेखक (२००५)
३. हेनरीच बॉल्, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१९८५)
४. ज्युलियन स्विंगर, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९९४)
५. उस्ताद निसार हुसेन खाँ, भारतीय गायक (१९९३)
६. वा. सी. बेंद्रे, भारतीय इतिहासकार (१९८६)
७. बरून दे, भारतीय इतिहासकार (२०१३)
८. जॉन हेनरिक क्लार्क, अमेरिकन इतिहासकार (१९९८)
९. व्हिक्टर होर्सले, भौतिकशास्त्रज्ञ (१९१६)
१०. मेरी टॉड लिंकन, अमेरिकेच्या पहील्या महिला, अब्राहम लिंकन यांच्या पत्नी (१८८२)

घटना

१. अपोलो ११ हे पहिले मानवरहित अंतराळयान यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आले. (१९६९)
२. भारताचे ९वे राष्ट्रपती म्हणून डॉ शंकर दयाळ शर्मा यांची निवड करण्यात आली. (१९९२)
३. हिजरी दिनदर्शिकेची सुरुवात झाली. मुहम्मद पैगंबर यांनी मदिनेहून प्रयाण केले तो दिवस. (६२२)
४. इराकचे संविधान लागू झाले. (१९७०)
५. पहिले पार्किंग मिटर ओक्लाहोमा येथे बसवण्यात आले. (१९३५)
६. स्वीडिश बँकेने युरोपमधील पहील्या नोटा चलनात आणल्या. (१६६१)

महत्व

१. World Snake Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...