मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १४ जुलै || Dinvishesh 14 July ||




जन्म

१. शंकरराव चव्हाण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (१९२०)
२. मिलिंद गुणाजी, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६८)
३.  गेराल्ड फोर्ड, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१९१३)
४. गरिमेल्ला सत्यनारायना, भारतीय स्वातंत्र्य सेनानी, लेखक कवी (१८९३)
५. गोपाल गणेश आगरकर, भारतीय समाजसुधारक (१८५६)
६. सुधा शिवपुरी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९३७)
७. यशवंत खुशाल देशपांडे, महानुभाव पंथाचे संशोधक (१८८४)
८. जॉफ्रेय विलकिन्सन, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९२१)
९. जेम्स ब्लॅक, नोबेल पारितोषिक विजेते औषध निर्माण शास्त्रज्ञ (१९२४)
१०. रोशनलाल नागरथ, भारतीय संगीतकार (१९१७)
११. योशिरो मॉरी, जपानचे पंतप्रधान (१९३७)
१२. चंद्रा भाणू गुप्ता, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री (१९०२)
१३. कैलाश चंद्रा जोशी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री (१९२९)

मृत्यू

१. लीला चिटणीस, भारतीय चित्रपट अभिनेत्री (२००३)
२. पॉल क्रूगर, साऊथ आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष (१९०४)
३. स्वामी शिवानंद सरस्वती, भारतीय धर्मगुरू, विचारवंत (१९६३)
४. वाय. व्ही. चंद्रचूड, भारताचे १६वे सरन्यायाधीश (२००८)
५. श्रीमंत विजयमाला राणीसाहेब, करवीर संस्थानाच्या महाराणी (१९९३)
६. मदन मोहन, भारतीय संगीत दिग्दर्शक (१९७५)
७. रिचर्ड मॅकडोनाल्ड, मॅकडोनाल्डचे सहसंस्थापक (१९९८)
८. धन गोपाळ मुखर्जी, भारतीय लेखक (१९३६)
९. प्रो. राजेंद्र सिंग, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ४थे सरसंघचालक (२००३)
१०. स्वामी कल्याणदेव, पद्म भूषण पुरस्कार विजेते धर्मगुरू, विचारवंत , समाजसुधारक (२००४)

घटना

१. न्युझीलंड मध्ये प्रथमच सार्वत्रिक निवडणुका झाल्या. (१८५३)
२. अल्विन जे. फेल्लोज यांनी मोज पट्टीचे पेटंट केले. (१८६८)
३. आल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाईट स्फोटकाची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली. (१८६७)
४. रॉबर्ट गोड्डार्ड यांनी इंधनावर चालणाऱ्या रॉकेटच्या डिझाईनचे पेटंट केले. (१९१४)
५. कॅनडा या देशात मृत्युदंड शिक्षेस बंदी घातली गेली. (१९७६)
६. तैवानमध्ये ३०वर्षाहून अधिक काळ लागू केलेला मार्शल लॉ हटवण्यात आला. (१९८७)
७. डाकतार विभागाची १६० वर्ष जुनी तार सेवा बंद करण्यात आली. (२०१३)

महत्व

१. Shark Awareness Day
२. Bastille Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...