मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष ११ जुलै || Dinvishesh 11 July ||




जन्म

१. सुरेश प्रभू ,भारतीय राजकीय नेते (१९५३)
२. जॉन क्विंच अॅडम्स, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१७६७)
३. शंकरराव खरात, भारतीय लेखक (१९२१)
४. टून टुन, भारतीय चित्रपट अभिनेत्री गायिका (१९२३)
५. मानव गोहिल, भारतीय चित्रपट अभिनेते (१९७४)
६. नारायण हरी आपटे, भारतीय लेखक साहित्यिक (१८८९)
७. बाबा कंशी राम, भारतीय लेखक , स्वातंत्र्य सेनानी (१८८२)
८. परशुराम कृष्णा गोडे, प्राच्यविद्या संशोधक (१८९१)
९. अमिताव घोष, भारतीय लेखक (१९५६)
१०. व्ही. आर. नेदूंचेझियान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री (१९२०)

मृत्यू

१. भिषम साहनी, भारतीय लेखक (२००३)
२. शांताराम नांदगावकर, भारतीय गीतकार (२००९)
३. अल्फान्सो मीचेल्सन, कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष (२००७)
४. नरसिंम्हा राजू, भारतीय चित्रपट अभिनेते (१९७९)
५. लॉरेन्स ओलिवियर, ब्रिटीश दिग्दर्शक , निर्माता (१९८९)
६. कर्त पुंठस, जर्मन लेखक (१९७५)
७. जॉर्ज जर्श्र्वीन, अमेरिकेन गीतकार (१९३७)
८. गब्रीएल लिप्पमंन, फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ (१९२१)
९. सुहास शिरवळकर, भारतीय लेखक साहित्यिक (२००३)
१०. मेजर रामराव राघोबा राणे, भारतीय सैन्य अधिकारी (१९९४)

घटना

१. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना मंडालेची सहा वर्षाची शिक्षा ब्रिटीश सरकारने ठोठावली. (१९०८)
२. पाकिस्तान अंतरराष्ट्रीय नाणे निधीचा सदस्य झाला. (१९५०)
३. ब्रिटीश पंतप्रधान लॉर्ड सलीसबरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. (१९०२)
४. मंगोलियाला चीनपासून स्वातंत्र्य मिळाले. (१९२१)
५. चीली मध्ये असलेल्या तांब्याच्या खाणींचे सरकारने राष्ट्रीयीकरण केले. (१९७१)
६. झेकोस्लोवाकियाने आपले संविधान स्वीकारले. (१९६०)
७. मुंबई येथे बसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात २००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर ७००हून अधिक लोक जखमी झाले. (२००६)
८. अमेरिकेची स्कायलॅब ही अंतराळातील प्रयोगशाळा हिंदी महासागरात कोसळली. (१९७९)
९. इराकमध्ये झालेल्या आतंकवादी बॉम्ब हल्ल्यात ३०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१३)

महत्व

१. International Essential Oils Day
२. World Population Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...