मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष १० जुलै || Dinvishesh 10 July ||




जन्म

१. राजनाथ सिंह, भारताचे रक्षामंत्री (१९५१)
२. अलोक नाथ, भारतीय चित्रपट अभिनेते (१९५६)
३. सुनील गावस्कर, भारतीय क्रिकेटपटू (१९४९)
४. जॉन केल्विन, फ्रान्सचे विचारवंत (१५०९)
५. पद्मा गोळे, भारतीय लेखिका कवयित्री (१९१३)
६. निकोला टेस्ला, अमेरिकन शास्त्रज्ञ, विद्युत अभियंता, यांत्रिकी अभियंता (१८५६)
७. पूर्णिमा हेंब्राम, भारतीय धावपटू (१९९३)
८. जी. ए. कुलकर्णी, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक (१९२३)
९. रा. भि. जोशी, भारतीय लेखक (१९०३)
१०. दिजूनंडा कर्ट्वाविजदा, इंडोनेशियाचे पंतप्रधान (१९११)
११. ओवेन चंबरलैन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९२०)
१२. महाठीर बिन मोहम्मद, मलेशियाचे पंतप्रधान (१९२५)
१३. सुंदर पिचई, अल्फाबेट आणि गूगलचे सीईओ (१९७२)

मृत्यू

१. के. के. श्रीनिवासन, भारतीय सैन्य अधिकारी (२००९)
२. जयवंत कुलकर्णी, भारतीय गायक (२००५)
३. जोहरा सेहगल, भारतीय चित्रपट अभिनेत्री, नृत्यांगना (२०१४)
४. डॉ. पांडुरंग पिसुर्लकर, भारतीय इतिहासकार (१९६९)
५. एलिझा लौरिल्लार्ड, डच लेखिका, कवयित्री (१९०८)
६. गोकुलानंदा माहापात्रा, भारतीय लेखक (२०१३)
७. ब्जेरणी बेनेडिक्टसन, आइसलँडचे पंतप्रधान (१९७०)
८. वक्कोम माजीद, भारतीय स्वातंत्र्य सेनानी, राजकीय नेते (२०००)
९. प्रभाकर उर्ध्वरेषे, भारतीय साहित्यिक लेखक (१९८९)
१०. सर गंगाराम, भारतीय वास्तुविद्याविशारद (१९२७)

घटना

१. बांगलादेश या वेगळ्या देशाला पाकिस्तान संसदेने मान्यता दिली. (१९७३)
२. मिल्लार्ड फिल्लमोर यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. (१८५०)
३. मुसोलिनिने इटली मध्ये सर्व राजकिय पक्षांवर बंदी घातली. (१९२३)
४. रोमानियाने बल्गेरिया सोबत युद्ध पुकारले. (१९१३)
५. वायोमिंग हे अमेरिकेचे ४४वे राज्य बनले. (१८९०)
६. पाकिस्तानमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत ४०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२००६)
७. आर्वी येथील विक्रम इन्सॅट भूकेंद्र राष्ट्राला समर्पित करण्यात आले. (१९९२)
८. महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाची स्थापना मुंबई येथे करण्यात आली. (१९७८)

महत्व

१. International Nikola Tesla Day
२. जलसंपत्ती दिवस

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...