मुख्य सामग्रीवर वगळा

दत्ताची आरती || १०८ नावे || अष्टक ||




*दत्ताची आरती*

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।
नेती नेती शब्द न ये अनुमाना॥
सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥ १ ॥

जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता ।
आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ धृ ॥

सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त ।
अभाग्यासी कैची कळेल हि मात ॥
पराही परतली तेथे कैचा हेत ।
जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥ २ ॥

दत्त येऊनिया ऊभा ठाकला ।
भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥
प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला ।
जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥ ३ ॥

दत्त दत्त ऐसें लागले ध्यान ।
हरपले मन झाले उन्मन ॥
मी तू पणाची झाली बोळवण ।
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ ४ ॥

 * विधिहरिहर  सुंदर *

विधिहरिहर सुंदर दिगंबर झाले ।
अनुसयेचें सत्त्व पाहावया आले ॥
तेथें तीन बाळक करुनीं ठेवीले ।
दत्त दत्त ऎसे नाम पावले ॥ १ ॥

जय देव जय देव जय दत्तात्रेया ।
आरती ओवाळूं तुज देवत्रया ॥ धृ. ॥

त्रिदेवांच्या युवती परि मागों आल्या ।
त्यांसि म्हणे ओळखुनी न्या आपुल्या पतिला ॥
कोमल शब्दें करुनी करुणा भाकील्या ।
त्यांसी समजावीतां स्वस्थाना गेल्या ॥ जय. ॥ २ ॥

काशी स्नान करवीरक्षेत्रीं भोजन ।
मातापूरी शयन होते प्रतिदान ॥
ऎसें अघटित सिद्धमहिमान ।
दास म्हणे हें तों नव्हे सामान्य ॥ ३ ॥




* श्री दत्तात्रेय १०८ नावे *

ॐ श्रीदत्ताय नमः ।
ॐ देवदत्ताय नमः ।
ॐ ब्रह्मदत्ताय नमः ।
ॐ विष्णुदत्ताय नमः ।
ॐ शिवदत्ताय नमः ।
ॐ अत्रिदत्ताय नमः ।
ॐ आत्रेयाय नमः ।
ॐ अत्रिवरदाय नमः ।
ॐ अनुसूयायै नमः ।
ॐ अनसूयासूनवे नमः ।
ॐ अवधूताय नमः ।
ॐ धर्माय नमः ।
ॐ धर्मपरायणाय नमः ।
ॐ धर्मपतये नमः ।
ॐ सिद्धाय नमः ।
ॐ सिद्धिदाय नमः ।
ॐ सिद्धिपतये नमः ।
ॐ सिद्धसेविताय नमः ।
ॐ गुरवे नमः ।
ॐ गुरुगम्याय नमः । 
ॐ गुरोर्गुरुतराय नमः ।
ॐ गरिष्ठाय नमः ।
ॐ वरिष्ठाय नमः ।
ॐ महिष्ठाय नमः ।
ॐ महात्मने नमः ।
ॐ योगाय नमः ।
ॐ योगगम्याय नमः ।
ॐ योगीदेशकराय नमः ।
ॐ योगरतये नमः ।
ॐ योगीशाय नमः ।
ॐ योगाधीशाय नमः ।
ॐ योगपरायणाय नमः ।
ॐ योगिध्येयाङ्घ्रिपङ्कजाय नमः ।
ॐ दिगम्बराय नमः ।
ॐ दिव्याम्बराय नमः ।
ॐ पीताम्बराय नमः ।
ॐ श्वेताम्बराय नमः ।
ॐ चित्राम्बराय नमः ।
ॐ बालाय नमः ।
ॐ बालवीर्याय नमः ।
ॐ कुमाराय नमः ।
ॐ किशोराय नमः ।
ॐ कन्दर्पमोहनाय नमः ।
ॐ अर्धाङ्गालिङ्गिताङ्गनाय नमः ।
ॐ सुरागाय नमः ।
ॐ विरागाय नमः ।
ॐ वीतरागाय नमः ।
ॐ अमृतवर्षिणे नमः ।
ॐ उग्राय नमः ।
ॐ अनुग्ररूपाय नमः ।
ॐ स्थविराय नमः ।
ॐ स्थवीयसे नमः ।
ॐ शान्ताय नमः ।
ॐ अघोराय नमः ।
ॐ गूढाय नमः । 
ॐ ऊर्ध्वरेतसे नमः ।
ॐ एकवक्त्राय नमः ।
ॐ अनेकवक्त्राय नमः ।
ॐ द्विनेत्राय नमः ।
ॐ त्रिनेत्राय नमः ।
ॐ द्विभुजाय नमः ।
ॐ षड्भुजाय नमः ।
ॐ अक्षमालिने नमः ।
ॐ कमण्डलुधारिणे नमः ।
ॐ शूलिने नमः ।
ॐ डमरुधारिणे नमः ।
ॐ शङ्खिने नमः ।
ॐ गदिने नमः ।
ॐ मुनये नमः ।
ॐ मौलिने नमः ।
ॐ विरूपाय नमः ।
ॐ स्वरूपाय नमः ।
ॐ सहस्रशिरसे नमः ।
ॐ सहस्राक्षाय नमः ।
ॐ सहस्रबाहवे नमः ।
ॐ सहस्रायुधाय नमः ।
ॐ सहस्रपादाय नमः ।
ॐ सहस्रपद्मार्चिताय नमः ।
ॐ पद्महस्ताय नमः ।
ॐ पद्मपादाय नमः ।
ॐ पद्मनाभाय नमः ।
ॐ पद्ममालिने नमः ।
ॐ पद्मगर्भारुणाक्षाय नमः ।
ॐ पद्मकिञ्जल्कवर्चसे नमः ।
ॐ ज्ञानिने नमः ।
ॐ ज्ञानगम्याय नमः ।
ॐ ज्ञानविज्ञानमूर्तये नमः ।
ॐ ध्यानिने नमः ।
ॐ ध्याननिष्ठाय नमः ।
ॐ ध्यानस्तिमितमूर्तये नमः ।
ॐ धूलिधूसरिताङ्गाय नमः ।
ॐ चन्दनलिप्तमूर्तये नमः ।
ॐ भस्मोद्धूलितदेहाय नमः ।
ॐ दिव्यगन्धानुलेपिने नमः ।
ॐ प्रसन्नाय नमः ।
ॐ प्रमत्ताय नमः ।
ॐ प्रकृष्टार्थप्रदाय नमः ।
ॐ अष्टैश्वर्यप्रदाय नमः ।
ॐ वरदाय नमः ।
ॐ वरीयसे नमः ।
ॐ ब्रह्मणे नमः ।
ॐ ब्रह्मरूपाय नमः ।
ॐ विष्णवे नमः ।
ॐ विश्वरूपिणे नमः ।
ॐ शङ्कराय नमः ।
ॐ आत्मने नमः ।
ॐ अन्तरात्मने नमः ।
ॐ परमात्मने नमः । 




* अष्टक दत्ताचे *


यामिनीस शोभवीत, चंद्र तों प्रजापती ।
दूर वास अवतार, तोचि श्रीउमापती ।
श्रीरमापतीच अत्रि, आश्रमांत राहिला ।
तो अनाथनाथ-दत्त, माहुरांत पाहिला ॥ १ ॥
जो अखंड चंद्र श्रीमृगेंद्र नाम शिखरीं ।
जो पहावयासि होति, वासना मसी खरी ।
म्यां वियोग-ताप त्या, चकोरतुल्य साहिला ।
तो अनाथनाथ-दत्त, माहुरांत पाहिला ॥ २ ॥
मायही यदा कदा, पिता कुमार भारवी ।
सद्गुरुस हांसतील, कीं उमा रमा रवी ।
जो कुठेंचि नीगमास, दिसला न गाइला ।
तो अनाथनाथ-दत्त, माहुरांत पाहिला ॥ ३ ॥  
अर्जुना अधीक आपल्याहिहून बाहु दे ।
याचका उचीत दान हे बहुत बाहुदे ।
जो सुरासुरें धराधरें नरेंही गाइला ।
तो अनाथनाथ-दत्त, माहुरांत पाहिला ॥ ४ ॥  
धर्म अर्थ काम मोक्ष, ग्राम गाणगापुर ।
श्रीगुरुचरित्रनाम, हेंचि गाणगापुर ।
नारसिंह श्रीसरस्वती स्वरुप जाहला ।
तो अनाथनाथ-दत्त, माहुरांत पाहिला ॥ ५ ॥   
ज्या कधीहि कष्टती न पातकांसि तासिता ।
वांच्छिती सदैव पाद, मृत्तिका सिताऽसिता ।
जो समस्त योगज्ञानि सन्मुनीनि ध्याइला ।
तो अनाथनाथ-दत्त, माहुरांत पाहिला ॥ ६ ॥  
जो रविशशीस स्वप्रकाश रंग वर्णवी ।
जो प्रबोध-ज्ञान-सिंधूचे-तरंग वर्णवी ।
जो घटांत ही मठांत, भूपटांत लीहिला ।
तो अनाथनाथ-दत्त, माहुरांत पाहिला ॥ ७ ॥    
जों न लोटिताहि जाय, भक्त लालसे दुर ।
जेंवि कां पटासि स्नेह, सक्त लाल सेंदूर ।
कीं रुपज्ञ मानिताति आम्रवृक्ष कोकिला ।
तो अनाथनाथ-दत्त, माहुरांत पाहिला ॥ ८ ॥  
जो सुगंधगंध मंद, हास्य मुख साजरा ।
पंकजा सतीगमेचि, नीलपंखसा जरा ।
जो सुगंधगंध देत, पाच जाइ जुईला ।
तो अनाथनाथ-दत्त, माहुरांत पाहिला ॥ ९ ॥  
जो त्रिगुणरुप पूर्ण, ब्रह्म आजरामर ।
ज्यासि सामरादि लोक, वारिताति चामर ।
जो अनुसुयेचिया निजूनि पायी नाहिला ।
तो अनाथनाथ-दत्त, माहुरांत पाहिला ॥ १० ॥  
हे सुधाकरासी देति, पुष्टी श्र्लोक आकरा ।
कोण या नको म्हणेल, पुण्यश्र्लोक 'आ' करा ।
विष्णुदास या कथामृतासि पिउनि धायिला ।
तो अनाथनाथ-दत्त, माहुरांत पाहिला ॥ ११ ॥  




* श्री दत्तात्रेय स्तवन स्तोत्रम् *

।। श्री गणेशाय नमः ।।

भूतप्रेतपिशाचाध्या यस्य स्मरणमात्रतः ।।
दूरादेव पलायत्ने दत्तात्रेय नमामि तम् ।।१।।

यंनामस्मरणादैन्यम पापं तापश्च नश्यति ।।
भीतीग्रहार्तीदु:स्वप्नं दत्तात्रेय नमामि तम् ।।२।।

दद्रुस्फोटककुष्ठादि महामारी विषूचिका ।।
नश्यंत्यन्येपि रोगाश्च दत्तात्रेय नमामि तम् ।।३।।

संगजा देशकालोत्था अपि सांक्रमिका गदाः ।।
शाम्यंति यत्स्मरणतो दत्तात्रेय नमामि तम्‌ ।।४।।

सर्पवृश्‍चिकदष्टानां विषार्तानां शरीरिणाम ।।
यन्नाम शांतिदे शीघ्र दत्तात्रेय नमामि तम्‌ ।। ५ ।।

त्रिविधोत्पातशमनं विविधारिष्टनाशनम्‌ ।।
यन्नाम क्रूरभीतिध्नं दत्तात्रेय नमामि तम्‌ ।। ६ ।।

वैर्यादिकृतमंत्रादिप्रयोगा यस्य कीर्तनात ।।
नश्यंति देवबाधाश्च दत्तात्रेय नमामि तम्‌ ।। ७ ।।

यच्छिष्यस्मरणात्सद्यो गतनष्टादि लभ्यते ।।
यः ईशः सर्वतस्त्राता दत्तात्रेय नमामि तम्‌ ।। ८ ।।

जयलाभयशःकामदातुर्दत्तस्य यः स्तवम्‌ ।।
भोगमोक्षप्रदस्येमं पठेदत्तप्रियो भवेत ।। ९ ।।

इति श्रीमत्‌ परमहंस परित्राजकाचार्य श्रीवासुदेवानंदसरसस्वती
विरवितं श्रीदत्तस्तवस्तोत्रं संपूर्णम ।।



* दत्त बावनी *

 स्तोत्राची रचना नारेश्वरनिवासी संत श्री रंग अवधूत महाराज

दत्त बावनी  

जय योगीश्वर दत्त दयाळ ! तुं ज एक जगमां प्रतिपाळ;
अत्र्यनसूया करी निमित्त, प्रगट्यो जगकारण निश्चित.

ब्रह्मा हरिहरनो अवतार, शरणागतनो तारणहार;
अंतर्यामी सत् चित् सुख, बहार सदगुरु द्विभूज सुमुख.

झोळी अन्नपूर्णा करमांह्य, शांति कमंडल कर सोहाय;
क्यांय चतुर्भूज षड्भूज सार, अनंतबाहु तुं निर्धार.

आव्यो शरणे बाळ अजाण; ऊठ दिगंबर, चाल्या प्राण !
सुणी अर्जुन केरो साद, रीझ्यो पूर्वे तुं साक्षात्;

दीधी रिद्धि सिद्धि अपार, अंते मुक्ति महापद सार.
कीधो आजे केम विलंब, तुज विण मुजने ना आलंब !

विष्णुशर्म द्विज तार्यो एम, जम्यो श्राद्धमां देखी प्रेम,
जंभ दैत्यथी त्रास्या देव, कीधी म्हेर तें त्यां ततखेव.

विस्तारी माया दितिसुत, इन्द्रकरे हणाव्यो तूर्त
एवी लीला कंइ कंइ शर्व, कीधी वर्णवे को ते सर्व.

दोड्यो आयु सुतने काम, कीधो एने तें निष्काम,
बोध्या यदुने परशुराम, साध्यदेव प्रहलाद अकाम.

एवी तारी कृपा अगाध ! केम सूणे ना मारो साद?
दोड, अंत ना देख अनंत ! मा कर अधवच शिशुनो अंत !!

जोइ द्विजस्त्री केरो स्नेह, थयो पुत्र तुं निःसंदेह;
स्मर्तृगामी कलितार कृपाळ ! तार्यो धोबी छेक गमार.

पेटपीडथी तार्यो विप्र, ब्राह्मण शेठ उगार्यो क्षिप्र ;
करे केम ना मारी व्हार ? जो आणीगम एक ज वार!!

शुष्क काष्ठ ने आण्यां पत्र ! थयो केम उदासीन अत्र ?
जर्जर वंध्या केरां स्वप्न, कर्या सफळ तें सुतनां कृत्स्न.

करी दूर ब्राह्मणनो कोढ, कीधा पूरण एना कोड.
वंध्या भेंस दूझवी देव, हर्युं दारिद्रय तें ततखेव.

झालर खाइ रीध्यो एम, दीधो सुवर्णघट सप्रेम.
ब्राह्मणस्त्रीनो मृत भरथार, कीधो सजीवन तें निर्धार !

पिशाच पीडा कीधी दूर, विप्रपुत्र ऊठाड्यो शूर;
हरी विप्रमद अत्यंज हाथ, रक्ष्यो भक्त त्रिविक्रम तात!!

निमिषमात्रे तंतुक एक, पहोंचाड्यो श्रीशैले देख!
एकीसाथे आठ स्वरूप, धरी देव बहुरूप अरूप,

संतोष्या निज भक्त सुजात, आपी परचाओ साक्षात्.
यवनराजनी टाळी पीड, जातपातनी तने न चीड,

रामकृष्णरूपे तें एम, कीधी लीलाओ कंइ तेम.
तार्यां पथ्थर गणिका व्याध ! पशुपंखी पण तुजने साध !!

अधमओधारण तारुं नाम, गातां सरे न शां शां काम !
आधि व्याधि उपाधि सर्व ! टळे स्मरणमात्रथी सर्व !

मूठचोट ना लागे जाण, पामे नर स्मरणे निर्वाण.
डाकण शाकण भेंसासुर, भूत पिशाचो जंद असुर

नासे मूठी दइने तूर्त, दत्तधून सांभळतां मूर्त.
करी धूप गाए जे एम ‘दत्तबावनी’ आ सप्रेम,

सुधरे तेना बंने लोक, रहे न तेने क्यांये शोक !
दासी सिद्धि तेनी थाय, दुःख दारिद्रय तेनां जाय !

बावन गुरुवारे नित नेम, करे पाठ बावन सप्रेम,
यथावकाशे नित्य नियम, तेने कदी न दंडे यम.

अनेक रूपे एज अभंग, भजतां नडे न माया-रंग.
सहस्त्र नामे नामी एक, दत्त दिगंबर असंग छेक !!

वंदु तुजने वारंवार, वेद श्वास नारा निर्धार !
थाके वर्णवतां ज्यां शेष, कोण रांक हुं बहुकृतवेष ?

अनुभव-तृप्तिनो उद्दगार, सूणी हसे ते खाशे मार.
तपसी ! तत्वमसि ए देव, बोलो जय जय श्रीगुरुदेव !


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...