मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष ८ जून || Dinvishesh 8 June ||




जन्म

१. शिल्पा शेट्टी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७५)
२. टी. एस. रमासमी पिल्लई, भारतीय राजकीय नेते , स्वातंत्र्य सेनानी (१९१८)
३. गश्मिर महाजनी, भारतीय चित्रपट अभिनेते (१९८५)
४. नजीर अली, भारतीय क्रिकेटपटू (१९०६)
५. फ्रान्सिस क्रिक, नोबेल पारितोषिक विजेते जीवशास्त्रज्ञ (१९१६)
६. डिंपल कपाडिया, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९५७)
७. सुहार्तो, इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष (१९२१)
८. केनिथ गेडिझ विल्सन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९३६)
९. दी. के. बेडेकर, लेखक (१९१०)
१०. रॉबर्ट ऑमांन, नोबेल पारितोषिक विजेते गणितज्ञ (१९३०)
११. एरिक विजचाऊस, नोबेल पारितोषिक विजेते जीवशास्त्रज्ञ (१९४७)
१२. केनी वेस्ट, अमेरिकन गायक (१९७७)

मृत्यू

१. हबीब तन्वीर, भारतीय लेखक , पटकथा लेखक (२००९)
२. मोहम्मद पैगंबर, इस्लाम धर्म संस्थापक (६३२)
३. अँड्र्यू जॅक्सन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१८४५)
४. राम नगरकर, मराठी रंगभूमी कलाकार (१९९५)
५. कोटाय्या प्रत्यागतमा, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (२००१)
६. जोस फिघेरेस, कॉस्टा-रिकाचे राष्ट्राध्यक्ष (१९९०)
७. जुआन कार्लोस ओंगानिया, अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष (१९९५)
८. के. एस. आर. दास, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (२०१२)
९. सानी अबाचा, नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष (१९९८)
१०. जॉर्ज टर्नर, ऑस्ट्रेलियन लेखक (१९९७)

घटना

१. रॉबर्ट जेंकिन्सन हे इंग्लंडचे पंतप्रधान झाले. (१८१२)
२. लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात लिहिलेले गीतारहस्यचे प्रकाशन झाले. (१९१५)
३. शियामचे नाव बदलून थायलंड ठेवले. (१९४९)
४. सॅम माणेकशॉ यांची लष्करप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. (१९६९)
५. बर्म्युडाने आपल्या संविधानात संशोधन केले. (१९६८)
६. युनिव्हर्सल पिक्चर्सची स्थापना कार्ल लेम्ल यांनी केली. (१९१२)
७. कुर्ट वालधेईम हे ऑस्ट्रियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९८६)
८. पाकिस्तानमध्ये झालेल्या बस बॉम्ब हल्ल्यात १५हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले, ३०हून अधिक लोक जखमी झाले. (२०१२)

महत्त्व

१. World Oceans Day
२. World Brain Tumor Day
३. International Day Of Action For Elephants In zoos 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...