मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष ३ जून || Dinvishesh 3 June ||




जन्म

१. जॉर्ज फर्नांडिस, भारतीय राजकीय नेते (१९३०)
२. एम. करुणानिधी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री (१९२४)
३. ऑटो लोर्वी, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८७३)
४. आनंदीबाई शिर्के, भारतीय लेखिका (१८९२)
५. जॉर्ज वाॅन बेक्से, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८९९)
६. बाबुराव पेंटर, भारतीय चित्रपट दिग्दर्शक निर्माता (१८९०)
७. एस. जी. दाणी, भारतीय गणितज्ञ (१९४७)
८. वरणेर अर्बर, नोबेल पारितोषिक विजेते शरीरशास्त्रज्ञ आणि औषधे (१९२९)
९. राऊल कॅस्ट्रो, क्युबाचे राष्ट्राध्यक्ष (१९३१)
१०. रिंकू राजगुरू, भारतीय चित्रपट अभिनेत्री (२००१)
११. राफेल नदाल, स्पॅनिश टेनिसपटू (१९८६)
१२. रणदीप सुरजेवाला, भारतीय राजकीय नेते (१९६७)

मृत्यु

१. जिया खान, भारतीय चित्रपट अभिनेत्री (२०१३)
२. आर्चिबाल्ड व्हिव्हियन हील, नोबेल पारितोषिक विजेते जीवरसायन शास्त्रज्ञ (१९७७)
३. सर दोराबजी टाटा, भारतीय उद्योगपती (१९३२)
४. मीनाक्षी शिरोडकर, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९९७)
५. अजय सरपोतदार , भारतीय मराठी चित्रपट दिग्दर्शक निर्माता (२०१०)
६. वामन गोपाळ जोशी, भारतीय पत्रकार (१९५६)
७. गोपीनाथ मुंडे, भारतीय राजकीय नेते (२०१४)
८. फ्रांस एमिल्ल सिलांपा, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१९६४)
९. सातो ईसाकु, जपानचे पंतप्रधान (१९७५)
१०.  गिरींद्रशेखर बोस, भारतीय मनोविश्लेशक (१९५३)
११. व्ही. व्ही. एस. अय्यर, भारतीय तमिळ लेखक (१९२५)

घटना 

१. माउंट बॅटनने आखलेली भारताच्या फाळणीची योजना प्रसिध्द झाली. (१९४७)
२. मराठेशाहीचा अस्त झाला. शेवटचा पेशवा बाजीराव हे ब्रिटिशांच्या स्वाधीन झाले. (१८१८)
३. कॉलेन व्हिपल यांनी पेच असलेला खिळा तयार करण्याचे मशीनचे पेटंट केले. (१८५६)
४. सिंगापूरने आपले संविधान स्वीकारले. (१९५९)
५. यितीहाक रॉबीन हे इस्राएलचे पंतप्रधान झाले. (१९७४)
६. भारतीय सैन्याने अमृतसर येथील सुवर्णमंदिरावर झालेल्या आतंकवादी हल्ल्यांत, आतंवाद्यांन विरूद्ध सैन्य अभियान सुरू केले. याला ऑपरेशन ब्लू स्टार या नावानेही ओळखले जाते. (१९८४)
७. पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना महर्षी कर्वे यांनी केली. (१९१६)


महत्व

१. World Clubfoot Day
२. Chimborazo Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...