मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २९ जून || Dinvishesh 29 June ||




जन्म

१. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, भारतीय मराठी नाटककार (१८७१)
२. प्रतापसिंग गायकवाड, बडोद्याचे महाराज (१९०८)
३. उपासना सिंघ , भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७५)
४. समीर चौघुले, मराठी चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेते (१९७३)
५. सर्गेई वित्ते, रशियाचे पंतप्रधान (१८४९)
६. प्रसांता चंद्रा महलनोबिस, भारतीय शास्त्रज्ञ ,संशोधक (१८९३)
७. कमलाकर सारंग, भारतीय रंगकर्मी, दिग्दर्शक निर्माता (१९३४)
८. पेद्रो संताना लोपेस, पोर्तुगालचे पंतप्रधान (१९५६)
९. चंद्रिका कुमारतुंगा, श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्ष (१९४५)
१०. अन्रेस्टोपेरेझ बॅलादेस, पनामाचे राष्ट्राध्यक्ष (१९५६)

मृत्यू

१. हरिसिंग प्रतापसिंह छावडा, भारतीय राजकीय नेते (२०१३)
२. दि. बा. मोकाशी, भारतीय मराठी साहित्यिक (१९८१)
३. एलिझाबेथ बॅरेट ब्राऊनिंग, ब्रिटीश कवयत्री लेखिका (१८६१)
४. मायकेल मधुसूदन दत्त, भारतीय बंगाली कवी (१८७३)
५. मोहम्मद बुदियाफ, अल्जेरियाचे राष्ट्राध्यक्ष (१९९२)
६. प्रा. शिवाजीराव भोसले, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू (२०१०)
७. फ्रांस सचोल्लायर्त, बेल्जियमचे पंतप्रधान(१९१७)
८. इग्णाशी पडेरेवस्की, पोलंडचे पंतप्रधान (१९४१)
९. शिवाजीराव भावे, सर्वोदयी कार्यकर्ते (१९९२)
१०. थॉमस हक्सले, ब्रिटीश जीवशास्त्रज्ञ (१८९५)

घटना

१. पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांना नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार जाहीर करण्यात आला. (२००१)
२. फ्रेहरर फ्रँकेंथुर हे ऑस्ट्रियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९११)
३. अर्जेंटिनाने फुटबॉल विश्वकप जिंकला. (१९८६)
४. छत्तीसगढ येथे पोलिसांनी १६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. (२०१२)
५. सेशेल्सला ब्रिटीश सत्तेतून स्वातंत्र्य मिळाले. (१९७६)
६. अमेरिकन फॉरेस्ट सर्विसची स्थापना झाली. (१८९१)

महत्व

१. National Statistics Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...