मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २८ जून || Dinvishesh 28 June ||




जन्म

१. पी. व्ही. नरसिम्हा राव, भारताचे पंतप्रधान (१९२१)
२. राजीव वर्मा, भारतीय चित्रपट अभिनेते (१९४९)
३. पिएरे लावल, फ्रान्सचे पंतप्रधान (१८८३)
४. बाबुराव सडवेलकर, भारतीय चित्रकार, महाराष्ट्र कला संचालक (१९२८)
५. विशाल दादलानी, भारतीय गायक , संगीत दिग्दर्शक (१९७३)
६. डॉ. गंगाधर पानतावणे, भारतीय मराठी लेखक साहित्यिक (१९३७)
७. आनंद ल. रॉय, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९७१)
८. इतामार फ्रँको, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष (१९३०)
९. रतन लाल जोशी, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१९२२)
१०. मुहम्मद युनूस, नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ (१९४०)
११. क्लाऊस वोन क्लिट्झिंग, नोबेल पुरस्कार विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९४३)
१२. एलोन मस्क, अमेरिकन उद्योजक, स्पेस ऐक्स, टेस्ला, PayPal चे संस्थापक (१९७१)

मृत्यू

१. चंद्रकांत कामत, भारतीय तबला वादक (२०१०)
२. रामभाऊ निसळ,भारतीय स्वातंत्र्य सेनानी ,पत्रकार (१९९९)
३. जेम्स मॅडिसन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१८३६)
४. प्रसांता चंद्रा महलानोबिस, भारतीय शास्त्रज्ञ (१९७२)
५. ज्युल्स अर्मांड डफौरे, फ्रान्सचे पंतप्रधान (१८८१)
६. प्रा. भालचंद्र गजानन खांडेकर, भारतीय मराठी लेखक साहित्यिक (१९२२)
७. कीची मियाजवा, जपानचे पंतप्रधान (२००७)
८. ए. के. लोहिथादास, भारतीय पटकथा लेखक, चित्रपट निर्माता (१९५५)
९. दादासाहेब जोग, भारतीय उद्योजक (२०००)
१०. डॉ. निर्मलकुमार फडकुले, भारतीय संत साहित्यकार (२००६)

घटना

१. भारत पाकिस्तान मधील दुसऱ्या युद्धानंतर सिमला परिषदेस सुरुवात झाली. (१९७२)
२. अडॉल्फ सॅक्स यांनी सॅक्सोफोनचे पेटंट केले. (१८४६)
३. एनरिको दे निकॉला हे इटलीचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९४६)
४. गोटलिब डेमलर आणि कार्ल बेंझ यांनी दोन कंपन्यांचे एकत्रीकरण करून मर्सिडीज बेंझची स्थापना केली.(१९२६)
५. बर्हनुद्दिन रब्बानी हे अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९९२)
६. संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्का विषयक सार्वत्रिक जाहीरनाम्याला पन्नास वर्षे पूर्ण झाली. (१९९८)

महत्व

१. International Body Piercing Day

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वारा || मराठी कविता संग्रह || Poems ||

नजरेस नसावी ओळख परी, स्पर्शून तो जातो !! क्षणात इथे ,क्षणात तिथे , सहज निघून तो जातो !! कधी पक्षांसवे गीत गात, सैरावैरा तो फिरतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! गुलाबी थंडीस मुठीत घेऊन, हळूवार तो पसरतो !! कधी सुर्यास भेटून येता, सारे हैराण तो करतो !! अलगद ढगांस घेऊन खांद्यावर, पाऊस पाडत येतो!! कधी घेऊन वादळ असे की , रौद्र रूप तो दाखवतो !! जसे हवे ते रूप त्याचे,  कोण कसे त्यास पाहतो !! कोणी म्हणे त्यास जे काही, तसेच तो राहतो !! कधी गंध येता जवळी, त्यास एकरूप तो करतो !! पानाफुलांत अन वेलितही, आपले अस्तित्व तो सोडतो !! जिथे भेटावे त्यास आपण,  नव्याने तो भेटतो !! कधी कोणत्या आठवातही, नकळत मग बोलतो !! प्रत्येक श्वास घेता आपण, आपलाच तो होतो !! ना कोणता राग, ना कोणता द्वेष, साऱ्यांस आयुष्य देतो !! नको बदलू मानवा हे चक्र, की तो सहन करतो !! उगाच दूषित करून तू त्यास, तुझाच अंत का करतो ?? फिरू दे त्यास बेफाम होऊनी, का उगाच अडवतो !! हा वारा साऱ्या जगास म्हणे, सहज व्यापून टाकतो !! ✍️© योगेश *All Rights Reserved*

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते. मग अश्या वेळी माझ्यासारख्या लोकांचा खूप गोंधळ होतो की एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या तत्वांना अनुकरण करणारी व्यक्ती नेमकी तत्वनिष्ठ म्हणायची की व्यक्तिनिष्ठ.  अशावेळी एकच उत्तर आपलेच आपल्याला मिळते आणि ते म्हणजे. व्यक्तिनिष्ठ व्यक्ती ही त्या तत्वांना त्याच्या विचारां नाच तर अनुकरण करत असते. मग त्या व्यक्तीला तत्वनिष्ठ म्हणता म्हणता ती व्यक्ती नकळत त्याच्या तत्वांना ही अनुकरण करत राहते.  प्रश्नाची उत्तरे इथेच येत असताना नकळत एक गोष्ट मनात येते की प्रत्येक व्यक्ती ही व्यक्तिनिष्ठ असतेच पण त्याला स्वतः चे एकही तत्व अथवा मत नसणे म्हणजेच ती व्यक्ती नकळत व्यक्तिनिष्ठ होऊन जाते. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या व्यक्तिनिष्ठ विचारांचा वारसा पुढे चालवत ...